Home Loan Update: होम लोन घ्यायचा विचार करत असाल तर ‘या’ पाच बँकांचा पर्याय ठरेल महत्वाचा! देतात होम लोनवर सवलत

Home Loan Update

Home Loan Update:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते व त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. परंतु तुम्हाला प्लॉट घेऊन घर बांधायचे असेल किंवा तयार घर घ्यायचे असेल तर खूप प्रचंड प्रमाणात पैसा यासाठी लागतो.

कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जागा आणि घरांच्या किमती भरमसाठ वाढल्याने बांधकाम साहित्यामध्ये देखील वाढ झाल्याने घर बांधणे पाहिजे तितके सोपी गोष्ट राहिली नाही. त्यामुळेच प्रत्येकालाच स्वतःचे घर उभारणे शक्य होत नाही.

याच समस्यामुळे बरेच जण होम लोनचा पर्याय निवडतात व स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु होमलोन घेताना तुम्ही ज्या बँकेकडून घेत आहात त्या बँकेचा व्याजदर किंवा आर्थिक दृष्टिकोनातून इतर गोष्टी समजून घेणे देखील तितकेच गरजेचे असते.

कारण होमलोनचा दीर्घकालीन प्रभाव हा तुमच्या सगळ्या आर्थिक बजेटवर होत असतो. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या होम लोनचा व्याजदर आणि इतर बाबी समजून घेऊनच होम लोनचा पर्याय निवडणे किंवा कोणत्या बँकेकडून होम लोन घ्यावे हे ठरवणे महत्त्वाचे असते.

याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये काही बँकांविषयी माहिती घेणार आहोत जे होम लोन वर काही आकर्षक ऑफर देत आहेत.

या बँकांकडून होमलोन घेणे ठरेल फायद्याचे

1- स्टेट बँक ऑफ इंडिया- एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक असून ही बँक वार्षिक 8.40% दराने होमलोन देत असून यामध्ये 0.17% प्रक्रिया शुल्काचा समावेश आहे. एवढेच नाही तर स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोनवर 0.65 टक्यांची सूट देखील देत आहे. या सवलतीचा लाभ 31 डिसेंबर 2023 पर्यंत घेता येणार आहे.

2- बँक ऑफ बडोदा- सणासुदीच्या कालावधीमध्ये बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ‘बीओबी के संग फेस्टिवल की उमंग’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली होती व ही मोहीम 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. या अंतर्गत बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून आकर्षक व्याजदरामध्ये होम लोन तसेच पर्सनल लोन, एज्युकेशन लोन व कार लोन देखील मिळणार आहे.

3- पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी बँक- तुम्हाला देखील होम लोन घ्यायचे असेल तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचा देखील पर्याय निवडू शकतात. पंजाब नॅशनल बँक 8.40 ते 10.60% व्याजदर आकारात आहे.

4- आयसीआयसीआय बँक- आयसीआयसीआय बँक ही खाजगी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बँक असून बँकेच्या माध्यमातून देखील बँकेच्या ग्राहकांना होम लोन दिले जाते. जर तुमचा सिबिल स्कोर साडेसातशे ते आठशे दरम्यान असेल तर आयसीआयसीआय बँक ग्राहकांसाठी नऊ टक्के व्याजदराने होम लोन देत आहे.

5- इंडियन बँक- इंडियन बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बँक असून होम लोनकरिता या बँकेचा पर्याय देखील फायद्याचा ठरू शकतो. इंडियन बँक 8.50% ते 9.90% या व्याजदराने होम लोन देत असून यामध्ये 0.23% प्रक्रिया शुल्क असणार आहे.

अशा पद्धतीने तुम्हाला जर होमलोन घ्यायचे असेल तर तुम्ही या बँकांचा पर्यायाचा विचार करू शकता.