Irrigation Subsidy: शेतामध्ये ठिबक केले आणि अनुदान मिळाले नाही का? आता संपली प्रतीक्षा! ‘या’ कालावधीत मिळेल शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Irrigation Subsidy:- राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राकरिता विविध पायाभूत सुविधांच्या उभारणी करिता अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. यामध्ये पशुपालन व्यवसायापासून तर ठिबक तसेच तुषार सिंचनाकरिता देखील अनुदानाची सोय काही योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार करत आहे.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ दिला जातो. या योजनांमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या ठिबक आणि तुषार सिंचनाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे

याच अनुषंगाने तुषार आणि ठिबक सिंचन अनुदानाच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आले असून ज्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान अजून पर्यंत मिळालेले नाही त्यांना लवकरात लवकर अनुदान मिळणार आहे.

 मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार ठिबकचे अनुदान?

बरेच शेतकऱ्यांनी अनुदानावर ठिबक सिंचन शेतामध्ये केले.परंतु त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारे अनुदान अजून पर्यंत मिळालेले नसल्याने बरेच शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत  आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के तर बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी 75% पर्यंत अनुदान या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते.

या अनुदानासाठी जे शेतकरी पात्र आहेत अशा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी 20 ऑक्टोबर 2023 रोजी कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती. या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांना आणि आधीच्या सोडतीत लाभ घेतलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान मात्र आले नसल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहेत.

परंतु आता हे अनुदान जिल्हा पातळीवर वितरित करण्यात आलेले असून लवकरच ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती देखील कृषी विभागाच्या फलोत्पादन संचालकांनी दिलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी होत्या

त्यामुळे अनुदान मिळण्यास विलंब होत आहे व यावर उपाय शोधून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदानाचा लाभ पोहोचवण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

 आचारसंहितेत देखील मिळणार अनुदान

सध्या देशांमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असली तरी देखील शासकीय कामकाज हे सुरूच राहणार असल्याने शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप हे सुरूच राहणार आहे

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत अनुदान मिळालेले नाही त्या सर्व शेतकऱ्यांना मार्च अखेर पर्यंत अनुदान मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देखील कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.