तरुणपणात कर्करोगावर मात करत घेतली खाजगी जेट व्यवसायात उडी! आज आहे करोडो रुपयांचा व्यवसाय, वाचा कनिका टेकरीवाल यांची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जीवनामध्ये आपण असे बरेच व्यक्ती पाहतो की ते खूपच धाडसी, कशीही परिस्थिती आली तरी न डगमगता त्यावर मात करण्याची क्षमता असलेले आणि जे मनामध्ये ठरवले आहेत ते काही करून पूर्ण करण्याची ताकद ठेवून असणारे असतात. अशी व्यक्ती कितीही जीवनामध्ये वाईट परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीशी दोन हात करत त्या परिस्थितीवर मात करतात व यशस्वी होतात.

तसेच काही काही व्यक्ती तर अनेक दुर्धर आजारांना देखील न जुमानता त्यावर देखील मात करून जीवनाची गाडी बिनधास्तपणे हाकत असतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण कनिका टेकरीवाल या भारतीय व्यावसायिक महिलेचे उदाहरण घेतले तर त्यांनी अवघ्या विसाव्या वर्षी कॅन्सर सारख्या आजारावर मात करत खाजगी जेट व्यवसायामध्ये उडी घेत आज करोडोंचा बिजनेस उभा केला आहे. त्यामुळे या लेखात आपण कनिका टेकरीवाल यांची यशोगाथा थोडक्यात बघणार आहोत.

 कनिका टेकरीवाल यांची यशोगाथा

कनिका टेकरीवाल यांचा जन्म 1990 च्या जून महिन्यामध्ये एका मारवाडी कुटुंबामध्ये झाला. आरामात जीवन सुरू असताना वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना कॅन्सर सारख्या प्राणघातक आजाराने ग्रासले. परंतु या आजाराला न घाबरता त्यांनी त्याच्याशी दोन हात केले व त्यातून बाहेर निघत आज करोडो रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे.

त्यांनी विमाने भाड्याने देणारी जेटसेटगो या भारतातील पहिल्या विमान भाड्याने देणारी कंपनीची स्थापना केली व त्या कंपनीच्या त्या संस्थापक आहेत. त्यांनी 2012 या वर्षी हा स्टार्टअप सुरू केला. विशेष म्हणजे जेव्हा त्यांची कॅन्सर सारख्या आजाराशी लढा सुरू होता.

अगदी याच कालावधीत त्यांना या व्यवसायाची कल्पना सुचली व यामध्ये त्यांनी आजारावर मात करत स्वतःची कंपनी सुरू करून तिला नवीन उंचीवर न्यायचे ठरवले. आज त्या 33 वर्षाच्या झाल्या असून एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी 420 कोटी रुपयांच्या संपत्ती सह देशातील श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले असून

त्यांची स्टार्टअप असलेली जेटसेटगो ही कंपनी चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणारी एक प्रसिद्ध व आघाडीची एअरक्राफ्ट एग्रीकेटर म्हणून आज संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. आजपर्यंत कनिका टेकरीवाल यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून एक लाख प्रवाशांकरिता 6000 उड्डाणे चालवली आहेत.

 अशाप्रकारे केली व्यवसायाला सुरुवात

जेव्हा त्यांची कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज सुरू होती तेव्हा त्यांना या वेगळ्या व्यवसायाची कल्पना आलेली होती. यामध्ये विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने देण्याची ती कल्पना होती व याबद्दल त्या त्यांच्या वडिलांशी बोलल्या. परंतु कनिका यांच्या वडिलांनी याला स्पष्ट शब्दात नकार दिला.

परंतु तरीदेखील न डगमगता कनिका यांनी धैर्याने या व्यवसायात यायचे ठरवले. या क्षेत्रातील गुंतागुंत जाणून घेण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला व स्वतः अभ्यास केला. आज त्यांच्याकडे स्वतःची 10 खाजगी विमाने असून लग्नानंतर त्या आता व्यवसायाचा विस्तार करत आहेत.

 हूरून रिच लिस्टमध्ये देशातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांपैकी एक

आज कनिका टेकरीवाल देशातील सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिलांपैकी एक असून त्यांना हूरून रिच लिस्टमध्ये देखील स्थान देण्यात आले आहे व भारत सरकारकडून राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. एवढेच नाही तर उद्योजक मासिकाने त्यांना ‘द स्काय  क्वीन’ या पदवीने देखील त्यांचा सन्मान केला आहे.