Phone Pay Earning: पैसे ट्रान्सफर करण्यासाठी नाहीतर पैसे कमावण्यासाठी करा फोन पे चा वापर! महिन्याला कमवू शकता 30 हजार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Phone Pay Earning:- नोकरऱ्याची उपलब्धता कमी असल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आता कामाच्या शोधात असतात. परंतु बऱ्याचदा हाताला काम मिळत नाही. त्यामुळे काही तरुण व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात व एखादा छोटा मोठा व्यवसाय करून आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात.

कामाच्या शोधात असणारे अनेक तरुण वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचा शोधात असतात व पैसे कसे मिळतील याचा कायम प्रयत्न करत असतात. यामध्ये घरी बसून तुम्हाला काही पैसा कमावता येईल का? याचा देखील शोध बरेच तरुण घेत असतात. तसे पाहायला गेले तर तुम्ही घरी बसून देखील ऑनलाईन माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात.

परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही वापरात असलेले फोन पे चा वापर करून देखील तुम्ही अगदी घरी बसून पैसा मिळवू शकता. त्यामुळे या लेखात आपण फोन पे चा वापर करून तुम्ही घरी बसून पैसा कसा कमवू शकतात? याबद्दलची माहिती बघणार आहोत.

 फोन पे च्या माध्यमातून पैसे कसे कमवता येतात?

सध्या देशामध्ये ऑनलाईन व्यवहारांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढला असून ऑनलाइन ट्रांजेक्शन करण्याकरिता बरेच व्यक्ती फोन पे चा वापर करतात. आपल्याला माहित आहे की फोन पे हे एक ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी बनवलेले एप्लीकेशन असून त्या माध्यमातून तुम्ही कुणाकडून पैसे मिळवू शकतात किंवा पैसे पाठवू शकतात तसेच रिचार्ज करणे,

इलेक्ट्रिक बिल वगैरे भरणे तसेच विमा भरणे यासारखे अनेक प्रकारचे ऑनलाइन व्यवहार तुम्ही फोन पे च्या माध्यमातून करू शकतात. याव्यतिरिक्त फोन पे तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देखील देते. साधारणपणे तुम्ही फोन पे च्या माध्यमातून दोन मार्गांनी पैसे मिळवू शकतात.

पहिला म्हणजे तुम्ही फोन पे मध्ये नोकरी करून पैसा मिळवू शकतात आणि दुसरा म्हणजे तुम्ही फोन पे ॲप्लिकेशन वापरून रेफर अँड अर्न प्रोग्रामचा वापर करून पैसे मिळवू शकतात.

 फोन पे काम करून तुम्ही तीस हजार रुपये कमवू शकतात

बरेच लोक ऑनलाइन पेमेंट आणि इतर ऑनलाइन सेवा देण्याकरिता फोन पे चा वापर करतात. देशामध्ये प्रत्येक दिवशी कोट्यावधी लोक अनेक प्रकारचे ऑनलाइन व्यवहारांकरिता फोन पे चा वापर करत असतात. परंतु बऱ्याच युजर्सना फोन पे वापरताना अनेक प्रकारच्या समस्या येत असतात.

ग्राहकांना ज्या काही फोन पे वापरताना समस्या येतात त्या सोडवण्याकरिता कंपनीच्या माध्यमातून कस्टमर केअर सपोर्ट डिपार्टमेंट तयार करण्यात आलेली आहेत.या माध्यमातून फोन पे अनेकांना नोकरी देत आहे. त्यामध्ये कर्मचारी घरी बसून कंपनीच्या ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी आहेत ते दूर करण्यासाठी मदत करतात.

फोन पे ने देखील ग्राहकांच्या समस्या सुटाव्या त्याकरता कस्टमर केअर सपोर्ट करिता एप्लीकेशन सुरू केले आहेत व तुम्हाला फोन पे चा कस्टमर केअर विभागामध्ये काम करायची इच्छा असेल तर तुम्ही तुमची पात्रता तपासून त्याकरिता अर्ज करू शकतात.

 रेफर अँड अर्न प्रोग्राम मधून कैसे पैसे मिळवाल?

फोन पे मध्ये एक रेफर अँड प्रोग्राम देखील असतो व त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रांना फोन पे ची लिंक पाठवून तुमचे खाते सेट केल्यानंतर या माध्यमातून पैसे कमवू शकतात

आणि प्रत्येक रेफरल वर साधारणपणे तुम्हाला शंभर रुपये मिळतात. या माध्यमातून तुम्ही जर दररोज चार किंवा पाच लोकांना जरी लिंक रेफर केली तरी तुम्ही प्रत्येक दिवसाला चारशे ते पाचशे रुपये आरामात मिळू शकतात.

अशा पद्धतीने तुम्हाला फोन पे पैसे कमवण्याची संधी निर्माण करून देते.