पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 5 हजार रुपये जमा करून बना लखपती! योजना आहे खूपच फायदेशीर, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छोट्या प्रमाणावर बचत करून ही बचत जर तुम्हाला चांगल्या योजनांमध्ये गुंतवायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना खूप फायदेशीर आहेत. प्रत्येक महिन्याला पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यकाळासाठी किंवा मुलांच्या उज्वल भविष्याकरिता मोठी रक्कम या माध्यमातून गोळा करू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक लहान बचत योजना राबवल्या जात असून यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित राहते व वेळेवर तुम्हाला परतावा देखील मिळण्याची हमी असते.

पोस्ट ऑफिसच्या अनेक फायद्याच्या योजना आहेत ज्या मॅच्युरिटीच्या वेळी लाखोंचे रिटर्न गुंतवणूकदारांना देतात.

या लेखामध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जी कमीत कमी गुंतवणुकीत चांगला परतावा गुंतवणूकदारांना देण्यास सक्षम आहे.

 पोस्ट ऑफिसची आरडी अर्थात रिकरिंग डिपॉझिट स्कीम

पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजेच आरडी स्कीम ही गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची योजना असून यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना खूप चांगल्या व्याजदराचा फायदा मिळतो.

तुम्ही या योजनेमध्ये पाच वर्षाच्या कालावधी करिता गुंतवणूक करू शकतात  व त्यानंतर गुंतवणूकदारांना चांगला व्याजदरासह उत्तम असा परतावा दिला जातो. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो व यामध्ये सध्या ग्राहकांना 6.7% दराने व्याज मिळत आहे.

तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये जरी या आरडी स्कीममध्ये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी चांगला परतावा मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडावे लागते व त्या खात्यात गुंतवणूक सुरू करावी लागते.

 दरमहा पाच हजार रुपये गुंतवून मिळेल लाखात परतावा

पोस्ट ऑफिसच्या या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला लाखोंचा परतावा मिळवायचा असेल तर या योजनेत प्रत्येक महिन्याला किमान पाच हजार रुपये गुंतवणूक गरजेचे आहे.

या योजनेत जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुमची एका वर्षामध्ये साठ हजार रुपये गुंतवणूक होते व पाच वर्षात तुमची गुंतवलेली रक्कम तीन लाख रुपये होते.

पोस्ट ऑफिस तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या या तीन लाख रुपयांवर 6.7 टक्के दराने व्याज देते. या व्याजदरानुसार पाच वर्षांनी दिले जाणारे एकूण व्याज हे 56 हजार 830 रुपये असते. म्हणजेच पोस्ट ऑफिस कडून पाच वर्षानंतर तुम्हाला 356830 रुपयाचा परतावा दिला जातो.

 या योजनेची इतर माहिती

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदाराचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आलेले असून या वयाचा किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही नागरिक या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतो. याशिवाय तुम्ही प्रत्येक महिन्याला कमीत कमी पाचशे रुपये देखील यामध्ये गुंतवू शकतात गुंतवणुकीची जास्तीत जास्त कुठलीही मर्यादा नाही.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे लागतात

या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, खाते उघडणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड तसेच आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर, बँक खात्याचा तपशील तसेच अलीकडील दोन पासपोर्ट आकाराचे फोटो असणे गरजेचे आहे.