Investment Plan: ‘ही’ योजना 55 वर्षात बनवेल तुम्हाला करोडपती! कोणती वापरावी लागेल ट्रिक्स? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Plan:- पैसे कमावणे आणि त्या कमावलेल्या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे ही बाब तुम्हाला भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. गुंतवणूक करताना ती चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते व या दृष्टिकोनातूनच प्रत्येक गुंतवणूकदार हा केलेली गुंतवणुकीची सुरक्षितता आणि परतावा याबाबतीत खूप विचार करून गुंतवणूक करत असतात.

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक योजना सध्या असून त्यामध्ये सरकारी योजना देखील आहेत तसेच काहीजण म्युच्युअल फंड एसआयपीचा पर्याय देखील निवडतात.

जर आपण अशा योजनांचा विचार केला तर यामध्ये पीपीपी अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना खूप महत्त्वाचे असून यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही निवृत्तीच्या वयापूर्वीच करोडपती होऊ शकतात. आता याकरिता तुम्हाला गुंतवणुकीची एक ट्रिक्स वापरणे खूप गरजेचे आहे व या ट्रिक्स तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत करोडपती होऊ शकतात.

 पीपीएफ योजनेत दीर्घ कालावधीसाठी करा गुंतवणूक

 गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अल्पकालीन गुंतवणुकीपेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो असे आपल्याला सध्या दिसून येते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ मधून तुम्हाला चांगला परतावा हवा असेल किंवा तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर यामध्ये तुम्हाला दीर्घकालासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे

व या योजनेमध्ये वर्षाला दीड लाख रुपयापर्यंत गुंतवणूक तुम्ही करू शकतात. म्हणजे महिन्याला बारा हजार पाचशे रुपयांचे गुंतवणूक करावी लागते. जर तुम्हाला पीपीएफ योजनेतून करोडपती व्हायचे असेल तर किती गुंतवणूक करावी लागेल व किती काळ? हे देखील तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे.

 7.1 टक्के व्याजदराचा घ्यावा फायदा

 ईपीएफ योजना ही केंद्र सरकारची योजना असून ती पूर्णपणे सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगली योजना आहे. या योजनेचे व्याजदर हे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून ठरत असतात.

सध्या या योजनेत 7.1% दराने व्याज दिले जात आहे. यामध्ये जर 15 वर्षासाठी बारा हजार पाचशे रुपये प्रति महिन्याला गुंतवणूक करणे गरजेचे आहे व पंधरा वर्षानंतर त्याचे 40 लाख 68 हजार रुपये 209 रुपये जमा होतात व गुंतवणुकीची रक्कम 22.5 लाख रुपये असेल आणि व्याज 18 लाख 18 हजार दोनशें रुपये असेल.

 या योजनेत गुंतवणुकीतून करोडपती कसे होता येईल?

 जर तुम्ही तीस वर्षापासून पीपीएफ मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करत आहात व प्रत्येक महिन्याला 12500 रुपये तुम्हाला जमा करावे लागतील व पंधरा वर्षांनी एकूण 40 लाख 68 हजार दोनशे नऊ रुपये जमा होते.यामध्ये तुम्ही पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पैसे न काढता या योजनेची मुदत पाच वर्षांनी दोनदा वाढवावी.

यामध्ये जर तुम्ही पंधरा वर्षानंतर पाच वर्षाची वाढ केली तर वीस वर्षाला तर तुमची एकूण गुंतवणुकीची रक्कम 66 लाख 58 हजार 288 रुपये होते. वीस वर्षाचे मदतीनंतर आणखी पाच वर्षासाठी जर तुम्ही मुदत वाढवली तर 25 वर्षानंतर या माध्यमातून तुमची रक्कम एक कोटी तीन लाख आठ हजार पंधरा रुपये इतकी होते अशा पद्धतीने तुम्ही करोडपती होऊ शकता.

 25 व्या वर्षी दहा हजार रुपये गुंतवणूक करून होता येईल करोडपती

 समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली तर पंधरा वर्षानंतर 7.1% व्याजदराने एकूण 32 लाख 54 हजार 567 रुपये त्यामध्ये जमा होतील व त्यामध्ये जर तुम्ही पाच- पाच वर्षाची मुदत वाढ केली तर वीस वर्षानंतर हे गुंतवणुकीचे एकूण मूल्य 53 लाख 26 हजार 631 रुपये असेल.

त्यात जर पुन्हा पाच वर्षासाठी वाढ केली तर पंचवीस वर्षानंतर एकूण 82 लाख 46 हजार 412 रुपये होते. तसे यामध्ये जर पुन्हा पाच वर्षांची वाढ केली तर तीस वर्षानंतर गुंतवणुकीचे मूल्य एक कोटी 23 लाख 60 हजार 728 रुपये होते. अशा पद्धतीने देखील तुम्ही 55 व्या वर्षी करोडपती होऊ शकतात.