पराग देसाईंनी कसे केले ‘वाघ बकरी चहा’चे 2 हजार कोटींचे साम्राज्य उभे! शून्यातून कसा केला व्यवसाय उभा? वाचा यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतामध्ये असे अनेक उद्योग व्यवसाय आहेत. आपण जर त्यांची यशोगाथा जर पाहिली तर अगदी शून्यातून सुरुवात करून हे व्यवसाय आज आकाशापर्यंत झेप घेत आहेत. या यशामागे नक्कीच त्या त्या व्यवसायिकांचे प्रचंड प्रमाणात असलेली मेहनत आणि व्यवसायासाठी लागणारे महत्वाचे कौशल्य कारणीभूत आहेत. असे अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतील की काही हजार कोटींच्या घरात या व्यवसायांची सध्या भरारी असून इतकेच नव्हे तर त्यांचे ब्रँड हे जागतिक पातळीवर देखील प्रसिद्ध आहेत.

अशाच व्यवसायातील जर आपण एक नाव पाहीले तर वाघ बकरी चहा हे होय. ही भारतातील एक प्रसिद्ध अशी चहा कंपनी असून  या कंपनीशी संबंधित असलेले महत्त्वाचे नाव म्हणजे या कंपनीच्या कार्यकारी संचालक पराग देसाई हे होय. दुर्दैवाची बातमी म्हणजे पराग देसाई यांचे नुकतेच निधन झाले. गेल्या आठवड्यामध्ये सकाळी मॉर्निंग वॉक साठी ते बाहेर पडले असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.

या हल्यातून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात ते तोल जाऊन पडले व त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ब्रेन हॅमरेज झाला व अहमदाबाद मध्ये खाजगी हॉस्पिटलात उपचार सुरू असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. पराग देसाई हे वाघ बकरी टी ग्रुप मधील चौथ्या पिढीतील उद्योजक होते.

या ग्रुपला चहा उद्योगांमध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यामध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण होती.जेव्हा त्यांनी 1995 मध्ये कंपनीची सूत्रे हाती घेतली तेव्हा वाघ बकरी टी कंपनी शंभर कोटी रुपयांची होती व आज त्या कंपनीचा व्यवसाय दोन हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

 पराग देसाईंनी कशी वाढवली कंपनी?

वाघ बकरी चहा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रसेश देसाई यांचे ते सुपुत्र होते. पराग देसाई यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी लॉन्ग आयलँड विद्यापीठातून एमबीए केलेले होते. तीस वर्षांपेक्षा जास्त व्यवसायाचा त्यांना अनुभव होता.

या अनुभवाच्या जोरावरच ते वाघ बकरी चहा ग्रुपचा व्यवसाय देखील सांभाळत होते. त्यांनी चहाच्या व्यवसायामध्ये अनेक धोरणात्मक बदल घडवून आणले आणि 70 होऊन अधिक लाऊंज आणि कॅफे भारतात सुरू केले. एवढेच नाही तर ते सीआयआय सारख्या इंडस्ट्री प्लेटफॉवर देखील खूप सक्रिय होते व त्यांनी मार्केटिंग तसेच ब्रँडिंग आणि पॅकेजिंग साठी अनेक यशस्वी प्लॅनिंग तयार केलेल्या होत्या. याच कामामुळे त्यांना अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशनने सन्मानित देखील केले होते.

 या कंपनीची सुरुवात कशी झाली होती?

1892 साली नारनदास देसाई या नावाचे जे काही उद्योजक होते ते दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते चक्क 500 एकर चहाच्या बागांचे मालक झाले. या कालावधीमध्ये त्यांनी चहाची लागवडीपासून तर अनेक प्रकारचे प्रयोग व चाचण्या इत्यादी त्या ठिकाणी केल्या व याकरिता तब्बल वीस वर्षे खर्च केले.

या कालावधीमध्ये त्यांनी चहाच्या उत्पादनापासून तर लागवडीपर्यंत ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या पूर्ण समजून घेतले. परंतु ब्रिटिशांच्या ताब्यात दक्षिण आफ्रिका असल्यामुळे त्या ठिकाणी देखील नारनदास यांना वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला व त्यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिका सोडून भारतामध्ये यावे लागले.

1915 यावर्षी ते भारतामध्ये परत आले व भारतामध्ये परत आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना जो काही चहा व्यवसायातील अनुभव आणि ज्ञान प्राप्त झाले होते त्या जोरावर त्यांनी अहमदाबाद या ठिकाणी चहा डेपोची सुरुवात केली. हळूहळू दोन ते तीन वर्षांमध्ये व्यवसायाला चांगली गती मिळायला लागली व काही वर्षांमध्ये ते गुजरात राज्यातील सर्वात मोठे चहा उत्पादक बनले. त्यानंतर हळूहळू व्यवसाय वाढवत असताना 1934 मध्ये त्यांच्या गुजरात टी डेपो ने या वाघ बकरी चहाच्या लोगोसह वाघ बकरी चहा ब्रँड सुरू केला.

1980 पर्यंत गुजरात चहा डेपोने सात रिटेल आउटलेटच्या माध्यमातून मोठ्या आणि किरकोळ प्रमाणामध्ये चहाची विक्री सुरू ठेवली. पॅकिंग केलेल्या चहाची गरज ओळखून या ग्रुपने 1980 मध्ये गुजरात टी प्रोसेसर अँड पॅकर्स लिमिटेड लॉन्च केले. पाहता पाहता 2003 पर्यंत वाघ बकरी टी ब्रँड गुजरात मधील सर्वात मोठा चहाचा ब्रँड बनला होता. या समूहाच्या उत्पादन सुविधांमध्ये दररोज दोन लाख किलो चहा आणि वार्षिक पाच कोटी किलो चहाचे उत्पादन करण्याची क्षमता आहे.

वाघ बकरी चहा सध्या देशातच नाही तर विदेशात देखील मोठ्या प्रमाणावर विक्री होतो. त्यानंतर वाघ बकरी टी लाउंज देखील देशभरात उघडण्यात आले असून आता तीस लाऊंन्ज आणि कॅफे देशभरात वाघ बकरी चहाचे आहेत. आजच्या परिस्थितीत वाघ बकरी चहा समूह वाघ बकरी सोबतच गुड मॉर्निंग, मिली तसेच नवचतन ब्रँडच्या माध्यमातून विविध प्रकारचे चहाची विक्री करतो. ही कंपनी ग्रीन टी, दार्जिलिंग टी, टी बॅग्ज, ते फ्लेवर्ड टी बॅग्ज आणि इन्स्टंट प्रेमिक्स टी देखील विकते.

 वाघ बकरी चहाच्या लोगोचा अर्थ काय होतो?

वाघ बकरी चहाचा लोगो हा एकता आणि सौहार्दचे प्रतीक आहे. या लोगो मधील वाघ हा वरच्या वर्गाचे तर शेळी खालच्या वर्गाचे प्रतीक आहे. या लोगो मध्ये दोघांना एकत्र चहा पिताना दाखवणे यामध्ये एक मोठा सामाजिक संदेश आहे. 1934 मध्ये गुजराती डेपो ने या लोगोसह वाघ बकरी चहा ब्रँड सुरू केला.