Real Estate News: दसरा-दिवाळीत मुंबई-पुण्यात घर घ्या आणि मिळवा हे फायदे! होईल पैशांची बचत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Real Estate News:- रियल इस्टेट हे दिवसेंदिवस वेगाने विकसित होत असून गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील रिअल इस्टेट क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते व परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून देखील रियल इस्टेट हे क्षेत्र खूप फायद्याचे आहे.

मुंबई आणि पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या बाबतीत रियल इस्टेट मध्ये खूप मोठे चान्सेस असून  त्यामुळे गुंतवणूकदारांचा घर किंवा दुकान तसेच गाळे विकत घेण्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येते. यासोबत विकसकांकडून देखील अनेक प्रकारच्या आकर्षक ऑफर देखील दिल्या जात असल्यामुळे रियल इस्टेट मधील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे.

तसेच मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे असे स्वप्न बऱ्याच जणांचे असते. परंतु घरांच्या वाढत्या किमती पाहता प्रत्येकालाच हे स्वप्न साकार करणे शक्य होत नाही. परंतु दसरा आणि दिवाळी सारख्या सणांच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारची खरेदी ही शुभ मानली जाते व त्याच दृष्टिकोनातून विकासकांकडून देखील तर घर खरेदीमध्ये किंवा प्लॉट खरेदीमध्ये अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्यामुळे या दसरा आणि दिवाळी सारख्या महत्त्वपूर्ण सणांच्या कालावधीमध्ये घर खरेदी करणे किंवा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हे खूप महत्त्वाचे आहे.

 रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ आहे फायद्याचा

1- दिल्या जातात ऑफर्स– दसरा आणि दिवाळी सारख्या सणासुदीच्या कालावधीमध्ये ग्राहक आकर्षित व्हावे याकरिता विकासक अनेक प्रकारच्या सवलती आणि ऑफर्स देऊ करतात. तसेच बरेच खरेदीदार देखील या कालावधीची प्रतीक्षा करत असतात व त्यानुसारच विकासक देखील घर किंवा इतर प्रॉपर्टी विकण्याचे नियोजन करत असतात. या कालावधीमध्ये तुम्हाला रोख सवलत किंवा ब्रोकरेज सवलत, नोंदणी आणि मुद्रांक शुल्का वरील लाभ तसेच ट्रॅव्हल व्हाउचर, मोफत कार पार्किंगच्या जागा इत्यादी सारखे फायदे मिळू शकतात.

2- अनेक नवीन प्रकल्पांची होते सुरुवात दसरा आणि दिवाळी सारख्या शुभ मुहूर्तावर विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन प्रकल्प सुरू करण्यात येतात. त्यामुळे सणासुदीच्या कालावधीमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पांचा मजबूत पोर्टफोलिओ आहे.

3-डील( वाटाघाटी) करण्यासाठी मोठी संधी या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात व त्यामुळे विक्रेते वाटाघाटी करायला देखील तयार असतात. त्यामुळे जर तुम्ही या सणासुदीच्या कालावधीमध्ये मालमत्ता खरेदी करायचे ठरवले तर तुम्ही योग्य प्रकारे वाटाघाटी करून जास्तीचे फायदे मिळवू शकतात किंवा पैशांमध्ये बचत करू शकतात.

4- या कालावधीत नोकरदार वर्गांना मिळणारा बोनसचा आधार मिळतो दसरा आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये पगारदार कर्मचाऱ्यांना विकासक आणि बँकांकडून देखील ऑफर दिली जाते व त्याशिवाय बोनस टक्केवारी देखील दिली जाते. त्यामुळे खरेदीदारांना बोनस मिळाल्यामुळे मालमत्ता खरेदीचा जो काही आर्थिक भार होतो तो कमी होण्यास मदत होते. मिळालेल्या बोनसचा वापर करून तुम्ही घर खरेदी करण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतात किंवा तयारी करू शकतात.

त्यामुळे या सणासुदीच्या कालावधीत जर तुम्हाला घर घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच या कालावधीचा फायदा उठवू शकता.