SBI Poultry Loan: स्टेट बँकेकडून 75% पर्यंत कर्ज घ्या आणि स्वतःचा पोल्ट्री उद्योग सुरू करा! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Poultry Loan:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन, मधुमक्षिका पालन यासारखे अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्यासोबतच आता कुक्कुटपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत. कुक्कुटपालन हा व्यवसाय परसातील कुक्कुटपालन या संकल्पनेतून आता कधीच बाहेर पडला असून मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता शेतकरी करत आहे.

यामध्ये करार पद्धत आल्याने  ब्रायलर कोंबड्यांचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून कुक्कुटपालन व्यवसाय दिवसेंदिवस विकसित होत आहे. एवढेच नाही तर आता पोल्ट्री उद्योगात अनेक तंत्रज्ञान आल्यामुळे एअर कंडिशनर शेड उभारून पोल्ट्री व्यवसाय केला जात आहे.

साहजिकच तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर पोल्ट्री व्यवसाय करायचा असेल तर त्याकरिता  भांडवल देखील जास्त प्रमाणात लागते व याच अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू करून चांगल्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करायचा असेल त्यांच्याकरिता केंद्र आणि

सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना काही योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. तसेच कुक्कुटपालन युनिट करिता बँकांच्या माध्यमातून देखील कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. याच पद्धतीने आता स्टेट बँक ऑफ इंडिया देखील पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्याकरिता एकूण खर्चाच्या 75 टक्के पर्यंत कर्ज देत आहे.

 पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे 75% पर्यंत कर्ज

याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्टेट बँक ऑफ इंडिया आता पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्याकरिता कर्ज देत असून ते एकूण खर्चाच्या 75% पर्यंत कर्ज देत आहे. बँकेकडून 75 टक्के कर्ज व स्वतःचा हिस्सा 25% यामध्ये शेतकऱ्यांना खर्च करावा लागणार आहे. याकरिता तुमच्या पोल्ट्री फार्म व्यवसायाचा संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तो बँकेला सादर करणे गरजेचे असणार आहे व या प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधारानेच तुम्हाला बँक कर्ज देणार आहे.

 किती वर्षासाठी असेल या कर्जाचा कालावधी?

या माध्यमातून तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया कुक्कुटपालनाकरिता कमाल नऊ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकते व या कर्जाचा व्याजदर हा 10.75 टक्क्यांपासून सुरू होतो. स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देण्यात येणाऱ्या या कर्जाचा परतफेडीचा कालावधी तीन ते पाच वर्षांचा असणार आहे.

 पोल्ट्री उद्योगाकरिता कर्जासाठी अर्ज तुम्हाला कुठे करावा लागेल?

जर तुम्हाला देखील पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता तुम्ही स्टेट बँकेच्या तुमच्या जवळच्या शाखेला भेट देणे गरजेचे असून या ठिकाणी याच्याशी संबंधित बँकेचे अधिकारी तुम्हाला संपूर्ण माहिती देतील. याच माहितीच्या आधारे तुम्हाला कर्जाकरिता प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल व तो बँकेत जमा करावा लागेल.

या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला किती खर्च येऊ शकतो यासंबंधीचे संपूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायासंबंधी तुम्ही दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट जर बँकेने एक्सेप्ट केला तर तुम्हाला कर्जाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते

 इतर काही महत्त्वाच्या गोष्टी

यासाठी तुम्हाला किमान दहा हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म सुरू करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे स्टेट बँक व्यतिरिक्त तुम्हाला नाबार्डच्या माध्यमातून देखील कुक्कुटपालनाकरिता कर्ज मिळते व हे कर्ज जास्तीत जास्त 27 लाख रुपयापर्यंत मिळू शकते. त्याबद्दल जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही नाबार्डच्या  https://www.nabard.org/ या वेबसाईटला भेट देऊ शकतात व यासंबंधीची अधिकची माहिती मिळवू शकतात.