स्टेट बँकेच्या ‘या’ मुदत ठेव योजनेत गुंतवा पैसा आणि लाखात मिळवा परतावा! वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Term Deposit Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर बरेच जण मुदत ठेव योजनांना खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतात. विविध बँकांकडून आकर्षक स्वरूपाच्या मुदत ठेव योजना राबवल्या जातात. गुंतवणुकीच्या दृष्टीने बँकांच्या मुदत ठेव योजना या आकर्षक परताव्यासाठी महत्त्वाच्या आहेतच

परंतु गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून देखील यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या बँकांच्या यादीमध्ये जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचा विचार केला तर ही देशातील सर्वात मोठी बँक असून मुदत ठेव योजनेच्या दृष्टिकोनातून एक विशेष मुदत ठेव योजना स्टेट बँकेने सध्या सुरू केले असून नुकतीच ग्रीनरुपी टर्म डिपॉझिट नावाच्या योजनेची घोषणा एसबीआयने केली असून या योजनेअंतर्गत पर्यावरण पूरक उपक्रम आणि प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.

महत्वाचे म्हणजे ज्यांना मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करायची इच्छा असेल अशा गुंतवणूकदारांंकरिता ही योजना खूप फायद्याची ठरणार आहे. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये ग्रीनरुपी टर्म डिपॉझिट योजना नेमकी काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत.

 कसे आहे ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट योजनेचे स्वरूप?

या योजनेमध्ये निवासी व्यक्ती तसेच अनिवासी आणि एनआरआय ग्राहक गुंतवणूक करू शकतात. या ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूकदारांना 1111 दिवस, 1777 आणि 2222 दिवस अशा तीन वेगवेगळ्या कालमर्यादेसाठी गुंतवणुकी करिता मुभा देण्यात आलेली आहे.

सध्या तरी या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही योजना ब्रांच नेटवर्कवर सध्या उपलब्ध असून लवकरात लवकर ही एसबीआय योनो आणि इंटरनेट बँकिंग सारख्या महत्त्वपूर्ण सेवांच्या माध्यमातून देखील डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 या रिटेल डिपॉझिटवर किती मिळेल व्याज?

जर समजा तुम्ही 1111 आणि 1777 दिवसांच्या रिटेल डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केली तर या रिटेल डिपॉझिट स्कीमवर 6.65% व्याज दिले जाणार असून 2222 दिवसांच्या योजनेवर 6.40 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.

तसेच किरकोळ ठेवीमध्ये 1111 आणि 1777 दिवसांच्या योजनेवर 6.15 टक्के व्याज दिले जाणार आहे व 2222 दिवसांच्या योजनेवर 5.90% व्याज मिळणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिक हे असलेल्या व्याजदरांपेक्षा अतिरिक्त व्याजदरांसाठी पात्र असणार आहेत.

 या योजनेचे मार्गदर्शक तत्वे आणि इतर महत्त्व

या योजनेतील मुदत ठेवी आणि विशेष मुदत ठेवींना लागू होणारी मार्गदर्शक तत्वे यामध्ये लागू राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे या योजनेत गुंतवणूकदारांना मुदत पूर्ण होण्याआधी पैसे काढता येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या योजनेत ठेवलेल्या रकमेवर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट किंवा कर्जाची सुविधा मिळणार आहे. तसेच जर आयकर नियमांचा विचार केला तर यामध्ये टीडीएस लागू करण्यात येणार आहे.

या पद्धतीने तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून या योजनेची अधिकची माहिती घेऊन गुंतवणूक करू शकतात.