Loan For Startup: तुम्हाला देखील स्टार्टअप सुरू करायचा आहे परंतु पैसा नाही? तर नका करू काळजी! या ठिकाणाहून होईल पैशांची सोय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan For Startup:- जगात कुठलीही गोष्ट करण्यासाठी सगळ्यात अगोदर पैसा लागतो. तुम्हाला एखादा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुमच्याकडे असलेली एखादी कल्पना व्यवसायामध्ये रूपांतरित करायची असेल तरीदेखील तुम्हाला पैसा लागतोच लागतो. परंतु बऱ्याचदा पैशाअभावी अनेक व्यवसाय करण्याची इच्छा असून देखील व्यवसाय करता येत नाही.

तसेच कल्पना देखील सत्यात उतरवायला पैसा लागतोच व यामुळे तुमच्या कल्पना देखील हवेतच विरतात. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी तुम्हाला पैसा असणे तितकेच गरजेचे आहे. विविध माध्यमातून पैसा उभारण्याचा प्रयत्न करतात. या पद्धतीने तुम्हाला देखील एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर केंद्र सरकारच्या अनेक पर्यायामधून तुम्ही निधी उभारू शकतात व तुमचा स्टार्टअप सुरू करू शकता.

 केंद्र सरकारच्या या योजना करतील तुम्हाला स्टार्टअप सुरू करायला मदत

1- पंतप्रधान मुद्रा योजना पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून तीन प्रकारची कर्ज दिली जातात. या मुद्रा कर्ज योजनेचे तीन प्रकार असून यामध्ये शिशुकर्जा अंतर्गत पन्नास हजार रुपये तसेच किशोर कर्जाअंतर्गत पाच लाख रुपये आणि तरुण कर्ज श्रेणी अंतर्गत दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते.

याकरता तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या कर्जाची माहिती घेऊ शकतात व कर्जासाठी अर्ज करू शकता. या कर्ज योजनेविषयी तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही या योजनेच्या mudra.org.in या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता.

2- क्रेडिट हमी योजना अर्थात क्रेडिट गॅरंटी स्कीम जर तुम्हाला स्टार्टअप सुरू करायचं आहे व ते देखील मोठ्या प्रमाणावर तर तुम्हाला जास्त पैसा लागेल. अशावेळी तुम्हाला स्टार्टअप सुरू करण्यासाठी क्रेडिट हमी योजना मदत करू शकते. क्रेडिट गॅरंटी स्कीम अर्थात क्रेडिट हमी योजनेच्या अंतर्गत कोणत्याही तारणाशिवाय किंवा हमीशिवाय दहा कोटी रुपये पर्यंत कर्ज दिले जाते.

तसेच डीपीआयआयटी अर्थात डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड नुसार स्टार्टअपच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांनाच या माध्यमातून कर्ज दिले जाते. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही ncgtc.in या अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधू शकता.

3- स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना या योजनेच्या अंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते. या अंतर्गत मार्केट एंट्री, प्रॉडक्ट ट्रायल, प्रोटोटाईप डेव्हलपमेंट, व्यावसायिकरण इत्यादीसाठी निधीची गरज आहे  अशा स्टार्टअपना या माध्यमातून कर्ज मिळते.

ज्या स्टार्टअपला डीपीआयआयटी अंतर्गत मान्यता मिळालेली आहे त्यांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळते. तसेच स्टार्टअप अर्ज करताना दोन वर्षापेक्षा जुना नसावा. या योजनेविषयी अधिक माहितीकरिता तुम्ही  seedfund.startupindia.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.