Tips For Become Rich:- गुंतवणूक करायची असेल तर ती अगदी मोठी रक्कम गुंतवणे गरजेचे असते असे नव्हे. “थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे तुम्ही अगदी छोटीशी रक्कम जरी गुंतवायला सुरुवात केली तरी तुम्ही काही वर्षानंतर कोटींचा निधी उभा करू शकतात हे तितकेच सत्य आहे.
त्याकरिता तुम्हाला फक्त नियमितपणे काही वर्षांकरिता सातत्याने गुंतवणूक करत राहणे गरजेचे असते.म्हणून गुंतवणुकीच्या चांगल्या चांगल्या योजनांमध्ये अशा पद्धतीने छोटी छोटी परंतु नियमितपणे गुंतवणूक केली तर खूप मोठा फायदा मिळतो. आता उदाहरणच घ्यायचे झाले तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना चहा प्यायचे सवय असते.
जर आपण बाहेर कुठे काम करत असु किंवा एखाद्या फिल्डवर काम करत असू तर जास्त नाही परंतु कमीत कमी दोनदा तरी आपण चहा घेतो. साधारणपणे वीस रुपये आपण या चहासाठी दिवसभरात खर्च करत असतो असे जरी पकडले तरी हा वीस रुपयांचा चहा न पिता त्यात वाचलेला पैसा जर तुम्ही गुंतवला तरी देखील तुम्ही योग्य आर्थिक शिस्तीने करोडपती होऊ शकतात. चहाचा खर्च वाचवून तुम्ही कशा पद्धतीने कोट्यावधीचा फंड जमा करू शकतात हे आपण या लेखात बघू.
दोन वेळच्या चहाच्या खर्चात कसे व्हाल करोडपती?
समजा तुम्ही चहावर जो काही दिवसाला कमीत कमी वीस रुपये खर्च करता म्हणजेच तुमचा जवळपास महिन्याला सहाशे रुपयांचा खर्च होत असतो. परंतु हेच सहाशे रुपये तुम्ही वाचवले व म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये त्यांची गुंतवणूक करायला सुरुवात केली तर दीर्घ कालावधी करिता गुंतवणूक करत गेल्यास या माध्यमातून तुम्हाला चांगला परतावा मिळणे शक्य आहे.
जर आपण म्युच्युअल फंडचा विचार केला तर बऱ्याच फंड्सने 20 टक्क्यांपेक्षा देखील जास्तीचा परतावा या माध्यमातून दिला आहे. यामध्ये विसाव्या वर्षी जर एखाद्या तरुणाने होणारा चहाचा वीस रुपयांचा खर्च वाचवून महिन्याला सहाशे रुपये एसआयपीमध्ये गुंतवले तर चाळीस वर्षे म्हणजे 480 महिन्यांमध्ये ही दरमहा केलेली गुंतवणूक 10 कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता असते.
तुम्ही करत असलेल्या गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 15 टक्के परतावा मिळत असेल तर चाळीस वर्षानंतर हा निधी 1.88 कोटी रुपये होतो. विशेष म्हणजे या 40 वर्षांमध्ये तुम्ही फक्त 2,88,00 रुपये जमा करतात व तुम्हाला दरमहा 600 रुपयांच्या एसआयपी वर 20 टक्क्यांचा परतावा मिळाला तर चाळीस वर्षानंतर एकूण 10.21 कोटी रुपये जमा होतात.
तसेच वयाच्या तीस वर्षे असलेल्या तरुणांनी दररोज 30 रुपये वाचवले दर महिन्याला ते नऊशे रुपये वाचतात. जर ही रक्कम म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून तीस वर्षांसाठी गुंतवली आणि वार्षिक दहा टक्के गुंतवणूक वाढवली तर एकूण 1.35 कोटी रुपये मिळतील. परंतु यासाठी 15 टक्के वार्षिक परतावा मिळणे गरजेचे आहे. म्हणजे तिसाव्या वर्षी तुम्ही महिन्याला 900 रुपये गुंतवायला सुरुवात केली तर वयाच्या साठाव्या वर्षी पर्यंत तुम्ही कोट्याधीश होऊ शकतात.
या पद्धतीने तुमची एक चहाची सवय सोडून त्यामधून वाचलेला पैसा करोडपती बनवू शकतो.