Banana Chips Business: दोन लाख रुपये गुंतवणुकीतून सुरू करा केळी चिप्स उद्योग! 50 किलो केळी चिप्स बनवण्यासाठी किती येतो खर्च? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banana Chips Business:- सध्या नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे अनेक तरुण-तरुणी छोट्या मोठ्या व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये बरेच जण शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाकडे देखील वळताना दिसून येत असून शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून देखील अशा प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

त्यामुळे शेती आधारित प्रक्रिया उद्योगांना येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठी संधी असणार आहे. अशाप्रकारे उद्योगांमध्ये जर आपण केळी प्रक्रिया उद्योगाचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने केळी चिप्स बनवण्याचा उद्योग खूप फायद्याचा ठरू शकतो.

कारण या उद्योगांमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या संधी आहेत. कारण केळी चिप्स उद्योगांमध्ये अजून देखील अनेक ब्रँडेड कंपन्या नसल्यामुळे स्पर्धा फार कमी आहे. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण केळी वेफर्स लघु उद्योगासाठी लागणारी आवश्यक यंत्रांची माहिती घेणार आहोत.

 केळी चिप्स लघु उद्योगासाठी आवश्यक यंत्रे किमती

1- केळी धुण्यासाठी टाकी यामध्ये जेव्हा कच्ची केळी शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते तेव्हा ती पुढील प्रक्रिये करिता पाठवण्याअगोदर पाण्याने स्वच्छ धुतली जाते व त्याकरिता टाकीची आवश्यकता असते. यासाठी केळी स्वच्छ करता यावी म्हणून स्टेनलेस स्टील पासून बनवलेली यंत्र उपलब्ध आहे. तीन बाय दोन फूट आकाराचे हे यंत्र 35 किलो वजनाचे आहे. या यंत्राच्या साह्याने एका वेळीला शंभर किलो केळी धुवून स्वच्छ करता येते व त्याची किंमत तीस हजारांपासून सुरू होते.

2- पॅकिंगसाठी लागणारी यंत्रे पॅकिंग साठी लागणाऱ्या यंत्रांमध्ये स्वयंचलित तसेच अर्ध स्वयंचलित आणि हाताने चालवायची सिलिंग यंत्र यांचा समावेश होतो. तयार चिप्स हे कुरकुरीत हवे याकरिता त्यांना उत्तम दर्जाचे प्लास्टिक व हवाबंद पॅकिंगची गरज असते. चिप्स प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅकिंग केले जातात व त्यांचे सिलिंग केले जाते.

सिलिंग यंत्रामध्ये हीटिंग कॉइल बसवलेली असते व सिंगल फेज वर चालणारे हे तीन किलोचे यंत्र असून एका तासाला 80 ते 100 किलो चिप्सचे पॅकिंग करण्याची याची क्षमता असते. यामध्ये लहान सिलिंग यंत्राची किंमत 2500 रुपयांपासून पुढे सुरू होते व स्वयंचलित यंत्राची किंमत 60000 रुपयांपासून सुरु होते.

3- बनाना स्लायसर या यंत्रामध्ये साल काढलेली केळी टाकली जाते व एका फिरत्या चकतीवर धारदार ब्लेड लावलेले असतात व त्या ब्लेडच्या प्रकारानुसार गोल काप किंवा रेषा असलेले उभे काप तयार करता येतात.

काप करण्याचे यंत्र स्वयंचलित असून त्याचे 70 किलो इतके वजन आहे.  हे यंत्र 100 ते 220 वोल्ट वर चालते व ते सिंगल फेज आहे. या यंत्राच्या साह्याने 150 किलो प्रतितास प्रमाणामध्ये काप तयार केले जातात. या यंत्राची किंमत 35 हजारापासून पुढे सुरू होते.

4- चिप्स फ्रायर या यंत्रामध्ये तेल गरम केले जाते व त्यामध्ये ते सातत्याने फिरते ठेवले जाते. यामुळे तेल लवकर खराब होत नाही व चिप्स  तळताना तळाशी जो काही गाळ जमा होतो किंवा अन्य पदार्थ जमा होतात ते बाहेर काढण्याची सुविधा देखील यामध्ये आहे.

हे पूर्णपणे स्वयंचलित यंत्र आहे. या यंत्राच्या माध्यमातून 50 ते 110 किलो पर्यंत प्रतितास चिप्स तळण्याची क्षमता आहे. या यंत्राचे वजन 80 किलो असून किंमत पन्नास हजारापासून पुढे सुरू होते. विशेष म्हणजे हे यंत्र इलेक्ट्रिक, डिझेल आणि गॅस यावर उपलब्ध आहे.

5- चिप्स फ्लेवरिंग/ मिक्सिंग मशीन तळलेल्या केळी चिप्स वर मसाला किंवा मीठ व त्यासोबतच चवीसाठी इतर घटक टाकले जातात. असे मसाले मिसळण्यासाठी हे यंत्र विकसित करण्यात आलेले आहे. हे मशीन फिरवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे पाते यामध्ये बसवलेले असून

मसाले मिक्स करण्यासाठी चिप्सचा चुरा होणार नाही या पद्धतीने ते फिरवले जातात. या यंत्राची क्षमता प्रतितास 60 किलो इतकी असून या यंत्राला 0.5 अश्वशक्तीची मोटर जोडलेली आहे.तसेच सिंगल फेज व 220 वोल्ट ऊर्जा लागते. दीडशे किलो वजनाचे हे यंत्र असून त्याची किंमत 65 हजारापासून सुरू होते.

 50 किलो चिप्स बनवण्यासाठी किती येतो खर्च?

तुम्हाला जर पन्नास किलो चिप्स निर्मिती करायची असेल तर त्याकरिता कमीत कमी 120 किलो कच्ची केळी लागते व त्याचा अंदाजित खर्च 3600 येतो. या केळीचे चिप्स तयार करण्यासाठी दहा ते पंधरा लिटर तेल लागते  व 160 रुपये प्रमाणे जर त्याचा खर्च पकडला तर तो 2400 रुपये होतो.

तसेच चिप्स फ्रायर मशीनला एका तासात दहा ते अकरा लिटर डिझेल लागते. एक लिटर डिझेल 95 रुपये याप्रमाणे 1045 रुपये यासाठी लागतात. त्यासोबतच मीठ आणि मसाले साडेतीनशे रुपये असा सगळा खर्च मिळून 7395 मध्ये 50 किलो चिप्स तयार होतात.

त्यामध्ये जर मजुरी व पॅकिंगचा खर्च पकडला तर दहा ते अकरा हजार रुपये 50 किलो चिप्स तयार करण्यासाठी लागतात. तुमची जर दहा ते बारा फुटाची स्वतःची जागा असेल तर दोन लाख रुपयांमध्ये तुम्ही हा उद्योग सुरू करू शकता.