Loksabha Elections : २०२४ जिंकण्याचे भाजपचे स्वप्न भंग होणार? भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता, काँग्रेसच्या लोकप्रियतेत वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loksabha Elections : नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार 2024 मध्ये भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या लोकप्रियेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आता भाजपचे टेन्शन वाढले आहे. निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा वेळ आहे, पण यात देशातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

त्याआधी मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. आज तक आणि सी वोटर यांनी गेल्या महिन्यात ‘मूड ऑफ द नेशन’ अंतर्गत राजकीय सर्वे घेतला होता. सध्याच्या घडीला निवडणूक झाली काय निकाल लागू शकतो, यावर सर्वे घेण्यात आला होता.

यामध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 298 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला 153 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 92 जागांवर समाधान मानावे लागेल, असं सर्वेतून समोर आले आहे. यामुळे काँग्रेससाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

त्यावरुन काँग्रेसच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे समोर येत आहे. तसेच यामध्ये भाजपला फटका बसल्याचे दिसत आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा झाल्याचे राजकीय जाणकरांनी सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात भाजपसाठी सरकार बनवणे अवघड जाणार आहे.

दरम्यान, सध्या सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने देखील यात्रा काढून वातावरण ढवळून काढले आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे.