Rohit Pawar : महाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट? त्यासाठीच राज्यपाल आलेत, रोहित पवारांचे मोठे वक्तव्य…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rohit Pawar : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. यामुळे रोज अनेक वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे.

ते म्हणाले, येत्या काही महिन्यांत राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू शकते का, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. भाजपकडून स्‍वतःकडे सत्ता ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता असून, त्‍यासाठीच नवीन राज्यपाल आले असल्‍याचे वैयक्‍तिक मत असल्‍याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच ते म्हणाले, मध्यावधी निवडणुका लागतील की नाही, हे सांगता येत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होऊ शकतात. तसेच येत्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट नक्की आहे. पोटनिवडणुकांमध्ये अपक्षांना रिंगणात उतरवत, दुसरीकडे मतदारांना भाजपकडून पैसेवाटप केले जात असल्‍याची टीका त्‍यांनी केली.

भाजपच्‍या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडले आहे. भाजप किती आर्थिक ताकद लावली आहे, कशा प्रकारे अपक्ष उमेदवारांना मतविभाजणासाठी निवडणुकीत उतरविले हे काही दिवसांत समोर येईलच. भारतीय जनता पक्षाला कोणत्याही स्थितीत राज्यातील सत्ता आपल्याच हाती ठेवायची आहे.

यासाठी ते काहीही करू शकतात. नामांतरणाच्‍या मुद्यावर ते म्‍हणाले, की आम्‍ही तेव्‍हाच स्‍वागत केले होते. महाविकास आघाडीत तेव्हाच निर्णय झाला होता. सध्या भाजपकडून सहानुभूतीसाठी सध्याचे राजकारण सुरू आहे. त्यांचा भर भावनिक राजकारण करण्यावर त्यांचा भर आहे.