10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! इस्रो मध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th Pass Job In ISRO : दहावी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थातच इस्रोमध्ये एक भरती जाहीर झाली आहे.

या भरतीच्या माध्यमातून इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. दरम्यान आज आपण या भरतीबाबत सर्व आवश्यक ती माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मराठवाड्यातील नागरिकांचा मुंबईकडील प्रवास होणार सुसाट; ‘हा’ नवीन मार्ग होणार तयार, शिरूरमधील वाहतुकीला पण होणार फायदा, पहा संपूर्ण रूटमॅप

कोणत्या पदासाठी होणार आहे भरती?

इस्रोच्या माध्यमातून तंत्रज्ञ-A, Drautsman-B आणि Radiographer-A या पदासाठी जाहीरात काढण्यात आली आहे.

किती जागांसाठी आहे भरती

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, तंत्रज्ञ-A या पदाच्या एकूण 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, Drautsman-B या पदाच्या पाच रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

तसेच Radiographer-A या पदाची एक रिक्त जागा भरली जाणार आहे. म्हणजेच एकूण 49 रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

वर नमूद केलेल्या पदांसाठी दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहे. सोबतच उमेदवाराने संबंधित ट्रेड मधील आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नादच खुळा! चक्क पांढऱ्या जांभळाची केली लागवड, एका एकरात झाली 4 लाखांची कमाई, पहा ही यशोगाथा

आवश्यक वयोमर्यादा

34 वर्षापर्यंतच्या उमेदवाराला या पदासाठी अर्ज करता येणार आहे. 

अर्ज कसा करावा लागणार आहे?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. https://www.vssc.gov.in/ या लिंक वर जाऊन इच्छुक अन पात्र उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतील.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?

अद्याप अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नसून चार मार्च 2023 पासून अर्ज प्रक्रिया राबवली जाणार असून 18 मे 2023 पर्यंत उमेदवाराला आपला अर्ज सादर करता येणार आहे.

भरतीची जाहिरात कुठे पाहणार

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी आपण ISRO Recruitment 2023 या लिंक वर क्लिक करून जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता. 

हे पण वाचा :- पुणे ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; प्रवाशांचा अर्ध्या तासाचा वेळ वाचणार, ‘हा’ अति महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी खुला, वाचा सविस्तर