शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अवकाळीच्या तोंडावर ‘त्या’ 12 हजार शेतकऱ्यांना मिळालेत 40 कोटी रुपये; तुम्हाला लाभ मिळाला की नाही?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे हाहाकार माजला आहे. शेतकरी बांधवांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांचा कालपर्यंत संप असल्याने शेतकऱ्यांचे अजून पंचनामे झाले नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान काल कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या चर्चा नंतर संप मागे घेतला आहे. यामुळे आता अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलद गतीने पूर्ण होतील आणि लवकरात लवकर शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.

दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना देखील राज्य शासनाकडून राबविले जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत चार याद्या प्रकाशित झाल्या आहेत. या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लगेचच पन्नास हजारापर्यंतच प्रोत्साहन वितरित होत आहे. वास्तविक ही योजना गेल्या महाविकास आघाडी सरकारने सुरू केली.

परंतु गत सरकारला आपल्या कार्यकाळात या योजनेची अंमलबजावणी करता आली नाही. वर्तमान शिंदे सरकारने मात्र या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारा हजार 987 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या 12,987 शेतकऱ्यांना आतापर्यंत 40 कोटी 29 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 22804 शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर झाले होते.

यापैकी 15761 शेतकऱ्यांची अनुदानासाठी यादी जाहीर झाली आहे. यापैकी 12,987 शेतकऱ्यांना आता अनुदान मिळाले असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच अनुदान दिले जाणार आहे. यासाठी मात्र यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रामाणिकरण करण्याचा सल्ला दिला जात आहे. अनुदान मिळवण्यासाठी आधार प्रमाणकरण गरजेचे असून आधार प्रमाणीकरण शिवाय या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

निश्चितच या योजनेअंतर्गत मिळणारा अनुदान संकटाच्या या काळात शेतकऱ्यांना दिलासा देणारे राहणार आहे. मात्र असे असले तरी राज्यातील नियमित पीक कर्जाची परतफेड करणारे अनेक जण अजूनही या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.