तुम्ही घरात किती रोकड रक्कम ठेऊ शकतात? घरात अधिक कॅश ठेवल्यास काय होते ? आयकर विभागाचा नियम वाचाच !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cash Limit Rule : आजची ही बातमी सर्वच भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. खरं पाहता पैसा हा मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांसाठी पैशांची गरज भासत असते.

आता पैसे आपण एक तर बँकेत ठेवतो आणि बँकिंग व्यवहाराने खर्च करतो. मात्र अनेकदा आपल्याला रोकड पैशांची देखील गरज भासत असते. काही लोकांना तर बँकिंग व्यवहार आवडत नाहीत म्हणून ते रोकड म्हणजेच कॅशने व्यवहार करतात.

अशा परिस्थितीत एखादा व्यक्ती आपल्या घरात किती रोकड किंवा कॅश ठेवू शकतो याबाबत आयकर विभागाचा काय नियम आहे? याबाबत अनेकांना जाणून घ्यायचे असते.

दरम्यान आजही आपण घरात किती रोकड रक्कम अर्थातच कॅश ठेवली जाऊ शकते यासंदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना; पहा…

घरात किती कॅश ठेवली जाऊ शकते?

 घरात किती कॅश असली पाहिजे याबाबत भारतीय आयकर विभागाचा कोणताच नियम नाही. एखादा व्यक्ती आपल्या गरजेनुसार आणि व्यवहारानुसार त्याला हवी तेवढी रक्कम आपल्या घरात ठेवू शकतो. मात्र, घरात असलेली रक्कम ही टॅक्स चोरीची नसावी.

घरात असलेली रक्कम व्यक्तीच्या उत्पन्नाचा भाग असली पाहिजे. जर ती रक्कम टॅक्सच्या अंतर्गत येत असेल तर त्यावरील टॅक्स भरणे अनिवार्य आहे. टॅक्स चोरी करून साठवलेली रक्कम ही ब्लॅक मनी अंतर्गत येते. एकंदरीतच एखादा व्यक्ती आपल्या घरात त्याला हवी तेवढी कॅश ठेवू शकतो मात्र त्या पैशांचा हिशोब त्याच्याकडे असणे गरजेचे आहे.

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावर पुन्हा सुरू झाली वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

अर्थातच भारतात एखादा व्यक्ती त्याच्या क्षमतेनुसार कितीही रक्कम घरात ठेवू शकतो. मात्र जर इन्कम टॅक्सची रेड पडली तर अशा व्यक्तीला त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आणि आवश्यक कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत.

जर तुम्ही कायदेशीररित्या पैसे कमावले असतील आणि त्याची पूर्ण कागदपत्रे तुमच्याकडे असतील किंवा आयकर रिटर्न भरला असेल, तर घाबरण्याची गरज नाही. परंतु आपण स्त्रोत सांगण्यास सक्षम नसल्यास आणि तुम्ही आयकर भरलेला नसेल तर आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकते.

हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच इथं करा अर्ज