सीआरपीएफमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तब्बल ‘इतक्या’ हजार रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू, पण……

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CRPF New Recruitment 2023 : ज्या तरुणांना सीआरपीएफमध्ये जाऊन सेवा करायची असेल तर अशा उमेदवारांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. सीआरपीएफच्या माध्यमातून एक मोठी भरती आयोजित झाली आहे. यासाठी इच्छुकांना आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.

या पदभरतीच्या माध्यमातून सीआरपीएफ तब्बल 9212 कॉन्स्टेबलची पदे भरणार आहे. यामुळे जे उमेदवार या पदासाठी आवश्यक पात्रता ग्रहण करत असतील अशा उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून आज आपण या भरतीबाबत सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ! शिंदे-फडणवीस सरकार लवकरच घेणार ‘हा’ राज्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक फायद्याचा निर्णय, पहा….

कोणत्या आणि किती पदांसाठी होणार आहे भरती?

सीआरपीएफने 9212 कॉन्स्टेबल ची पदे भरण्यासाठी भरती काढली आहे. यामध्ये 107 पदे महिला उमेदवारांसाठी राखीव राहणार आहेत तर इतर पदे ही पुरुषांसाठी राहणार आहेत. दरम्यान या भरतीची अधिसूचना बऱ्याच दिवसांपूर्वी काढण्यात आली असून आता यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट मोटर ड्रायव्हिंग लायसन्स देखील असणे यासाठी बंधनकारक आहे.

हे पण वाचा :- टाटाची कमाल ! टाटा समूहाच्या ‘त्या’ शेअरची जोरदार कामगिरी; ‘इतक्या’ वर्षात गुंतवणूकदाराच्या 10 लाखांचे बनवलेत 10 कोटी, पहा कोणता आहे तो स्टॉक

अर्ज कसा करावा लागेल?

यासाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. crpf.gov.in या सीआरपीएफच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन सादर करू शकणार आहेत.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक?

सीआरपीएफने काढलेल्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 25 एप्रिल 2023 पर्यंत अर्थातच या महिन्याच्या शेवटच्या मंगळवार पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे. 

निवड कशी केली जाईल?

मिळालेल्या माहितीनुसार या भरतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड लेखी परीक्षा घेऊन केली जाणार आहे. ही परीक्षा 1 जुलै ते 13 जुलै या कालावधीमध्ये पार पडणार आहे.

हे पण वाचा :- मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ मेट्रोमार्ग प्रकल्पाबाबत झाला मोठा निर्णय; आता मुंबई ते ठाणे प्रवास लवकरच होणार सुसाट, पहा काय आहे निर्णय?