DA Hike: या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार चार टक्के महागाई भत्तावाढ, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाईभत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांमध्ये त्यांच्या घर भाडे अर्थात एचआरएमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या देखील महागाई भत्ता संदर्भात मागण्या आहेत. यामध्ये राज्यातील खाजगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक/ शिक्षकेतर, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. याच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे.

 राज्यातील खाजगी अनुदानित शिक्षकांना मिळणार चार टक्के महागाई भत्ता वाढ

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राज्यातील खाजगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित आश्रम शाळेतील कार्यरत शिक्षक/ शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा थकबाकी हप्ता व चार टक्के महागाई वाढ भत्ता तातडीने देण्यात यावा या मागणी करिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून विदर्भस्तरीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलेले होते. परंतु कर्मचाऱ्यांच्या या आंदोलन सुरू होण्यापूर्वी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चार टक्के महागहीभत्ता वाढ देण्याची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे.

 विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या होत्या मागण्या

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी( माध्यमिक) जिल्हा परिषद कार्यालय समोर व शिक्षण उपसंचालक नागपूर/ अमरावती यांच्या कार्यालयासमोर राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा थकबाकी हप्ता व चार टक्के महागाई भत्तावाढ देण्याकरिता शुक्रवारी आंदोलन पुकारले होते.

या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना 22 जूनला नोटीस देखील देण्यात आलेल्या होत्या. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु अद्याप पर्यंत राज्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तिसरा हप्ता देण्यात आलेला नाही.

तसेच जानेवारी 2023 पासून केंद्रातील कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू केला असल्यामुळे त्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात यावा याकरिता हे आंदोलन करण्यात येणार होते. त्यामुळे आता या मागणीच्या संदर्भात महागाई भत्ता वाढ करण्यात आली असून दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकी सोबत जून 2023 च्या पगारासोबत रोखीने देण्याचे आदेश आता निर्गमित करण्यात आलेले आहेत.