एल निनो बाबत भारतीय हवामान तज्ञांनी दिली ‘ही’ माहिती; EL Nino म्हणजे काय? शेतकऱ्यांनो एकदा वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

El Nino Monsoon 2023 : अमेरिकेतील हवामान विभागाने केल्या काही दिवसांपूर्वी एलनिनो बाबत मोठ भाष्य केल आहे. या अमेरिकन विभागाने यावर्षी एलनिनोमुळे भारतासमवेतच आशिया खंडातील काही देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती भासवू शकते असा अंदाज बांधला आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये भीतीची अवस्था सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान तज्ञांनी मात्र शेतकऱ्यांना घाबरून न जाता याबाबत आत्ताच अंदाज वर्तवणे घाई-घाईचे ठरेल असे मत व्यक्त केल आहे.

विशेष बाब म्हणजे अमेरिकेच्या हवामान विभागाच्या अंदाजाला देशातील काही संस्थांनी दुजोरा दिला आहे. यासोबतच जागतिक हवामान संघटनेने देखील एल निनो सक्रिय झाला तर जगभरात तापमान वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. याबाबत मात्र ज्येष्ठ हवामान तज्ञ रंजन केळकर यांनी आतापासूनच याविषयी अंदाज बांधणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

एवढेच नाही तर आत्तापर्यंत एल निनो जेवढ्यावेळी सक्रिय झाला आहे त्याच्या निम्म्या वेळा एल निनो मध्ये देखील भारतात समाधानकारक पाऊस पाहायला मिळाला आहे. यामुळे आतापासूनच याविषयी अंदाज बांधणे चुकीचे राहणार असून यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल असे देखील मत त्यांनी व्यक्त केल आहे. अशा परिस्थितीत आज आपण नेमका एल निनो म्हणजे काय आणि याचा काय परिणाम होतो याबाबत जाणून घेणार आहोत.

एल निनो म्हणजे काय?

याबाबत तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागात ज्यावेळी हवेचा दाब वाढतो त्यावेळी पश्चिम भागातून पूर्वेकडे वारे वाहत जातात. केवळ वारायचं नाही तर या सोबत बाष्पाने भरलेले ढग देखील वाहतात. याचा परिणाम म्हणून पूर्वेकडे अतिवृष्टी सारखी परिस्थिती तयार होते आणि पश्चिमेकडे दुष्काळाची परिस्थिती तयार होते.

म्हणजेच बाष्पयुक्त ढग पूर्वेकडे गेल्याने त्या ठिकाणी अतिवृष्टी होते आणि ज्या ठिकाणाहून बाष्पयुक्त ढग वाहतात तेथून पूर्वेकडे दुष्काळ असतो. म्हणजेच जर ही परिस्थिती तयार झाली तर भारतासह आशिया खंडातील काही देशात दुष्काळ राहील मात्र अमेरिका ब्राझील अर्जेंटिना इत्यादी देशात यामुळे अतिवृष्टी सारखी परिस्थिती तयार होईल.

मात्र याबाबत आत्तापासूनच अंदाज बांधणे चुकीचे असल्याचे मत काही भारतीय हवामान तज्ञांनी व्यक्त केलं असल्याने आता भारतीय हवामान विभाग एप्रिल महिन्यात मान्सून बाबत जो आपला पहिला अहवाल किंवा अंदाज सार्वजनिक करेल त्यावेळीच याबाबत योग्य ती स्पष्टोक्ती येऊ शकणार आहे.