Election Rule: निवडणुकीत उमेदवारांना किती करता येतो खर्च? प्रचारासाठी किती वापरता येतात वाहने? वाचा निवडणुकीचे ए टू झेड नियम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Election Rule:- सध्या देशामध्ये येणाऱ्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असून नुकत्याच देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम व इतर पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्रात देखील ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत.

या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नेमके उमेदवारांना किती खर्च करता येतो किंवा निवडणुकीचे नियम काय असतात व कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते. इत्यादी बद्दल अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण निवडणूक आणि उमेदवार यांच्या बाबतीत असलेली महत्त्वाचे नियम इत्यादी बद्दल माहिती घेणार आहोत.

 काय असतात निवडणुकांचे नियम?

1- उमेदवारांना प्रचाराकरिता वेळ का दिला जातो?- जेव्हा निवडणूक आयोगाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होते तेव्हा दोन आठवड्यांनी मतदानाची तारीख दिली जाते व यामध्ये विविध पक्षांचे उमेदवार लोकांमध्ये जाऊन लोकांचे मन स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. तसेच मतदारांना या कालावधीमध्ये योग्य उमेदवार आणि योग्य पक्ष कोणता याचा निर्णय घेण्यास वाव मिळतो व चांगला लोकप्रतिनिधी निवडून येण्याच्या कामी दिलेला कालावधी महत्त्वाचा ठरतो.

2- मतदानाच्या 48 तास प्रचारावर बंदी का असते?- मतदान जेव्हा असते त्याच्या 48 तास आधी निवडणूक पूर्व शांतता म्हणजेच शांतता कालावधी सुरू होतो व या कालावधीमध्ये निवडणूक प्रचाराशी संबंधित सर्व प्रक्रिया थांबवल्या जातात किंवा त्यावर बंदी घालण्यात येते.

या कालावधीमध्ये सभा तसेच भाषणे व मुलाखती तसेच जाहिराती आणि मदयविक्रीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी केली जाते. मतदार मतदान करताना  शांत राहावेत आणि कोणत्याही प्रचाराचा प्रभाव त्यांच्यावर मतदानाच्या वेळी होऊ नये व विवेक बुद्धीने त्यांना मतदान करता यावे हा त्यामागचा उद्देश असतो.

3- उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा असते का?- निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात येते. उमेदवार या मर्यादेपेक्षा जास्तीचा खर्च करू शकत नाही. जर आपण उदाहरणच घेतले तर मोठ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला प्रचार खर्च मर्यादा 28 लाखांवरून ती 40 लाख करण्यात आली आहे तर छोट्या राज्यांमध्ये विधानसभा उमेदवार हा आता 28 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो.

4- उमेदवाराच्या निवडणूक खर्चाचा हिशोब कोण ठेवते?- निवडणुकीमध्ये जो काही खर्च होतो त्याचा खर्च उमेदवाराला स्वतःकडे ठेवावा लागतो व जेव्हा निवडणुकीचा निकाल लागतो त्याच्या तीस दिवसांच्या आत या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाला देणे गरजेचे असते. निवडणुकीचा अर्ज केल्याचा दिवसापासून ते निकालापर्यंत जो काही उमेदवाराचा खर्च झालेला आहे त्याचा संपूर्ण तपशील हा जिल्हा निवडणूक आयुक्त यांच्याकडे सादर करणे गरजेचे असते.

समजा एखाद्या वेळी उमेदवाराने या खर्चाचा हिशोब सादर केला नाही तर त्याला तीन वर्षाकरिता निवडणूक लढवण्यावर बंदी घालता येते. तसेच निवडणूक आयोगाने जी काही खर्च मर्यादा जाहीर केली आहे त्यापेक्षा जास्त खर्च उमेदवारांनी केला तर तो भ्रष्ट समजला जातो.

5- उमेदवार मर्यादेपेक्षा जास्त खर्च करत असेल तर कुठे अपील करावे?- समजा उमेदवाराने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला असेल तर मतदारसंघातील कोणताही नागरिक न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो व ही याचिका निकाल लागल्यानंतर च्या 45 दिवसांच्या आत दाखल करणे गरजेचे असते.

6- मंदिर किंवा शाळेसारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रचार करता येतो का?- मंदिर तसेच मशिदी व गुरुद्वारासारख्या धार्मिक स्थळांमध्ये निवडणूक प्रचार करायला बंदी आहे किंवा मनाई आहे. एवढेच नाही तर विवाह गृह किंवा सिनेमा थेटर सारख्या सामाजिक ठिकाणी प्रचार केल्यास कारवाई होऊ शकते.

जेव्हा आचार संहिता लागू केली जाते तेव्हा सत्ताधारी असलेल्या पक्षाला चित्रपटांमधून देखील सरकारचे समर्थन करता येईल अशा आशयाचा प्रचार करता येत नाही. तसेच महत्त्वाचे म्हणजे ज्या दिवशी निवडणूक असते तेव्हा मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या परीघामध्ये कोणत्याही प्रकारे मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करता येत नाही.

7- प्रचारासाठी किती वाहने वापरता येतात?- निवडणूक प्रचारामध्ये वाहनांचा वापरावर कुठलीही मर्यादा नाही परंतु याकरिता निवडणूक आयोगाची परवानगी घेणे गरजेचे असते. वैध परवानगी मिळाल्यानंतरच निवडणूक प्रचारासाठी वाहनांचा वापर करता येतो व यामध्ये परमिट नसलेल्या वाहनांचा वापर करता येत नाही.

वाहनामध्ये स्वतंत्र लाऊड स्पीकर बसवणे किंवा त्यामध्ये बदल करायचा असेल तरी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. तसेच संबंधित वाहनाच्या परमिट कार्डची मूळ प्रत वाहनाच्या पुढच्या स्क्रीनला चिकटवणे गरजेचे आहे व ते वाहन कोणत्या उमेदवाराकरिता वापरले जात आहे याचा देखील उल्लेख स्पष्टपणे केलेला असणे महत्त्वाचे आहे.

8- बॅनर आणि पोस्टर्स वापरण्याबाबतचे नियम जेव्हापासून आचारसंहिता लागू केली जाते त्यानंतर लगेच निवडणूक आयोग होर्डिंग तसेच पोस्टर्स, बॅनर काढण्याची प्रक्रिया सुरू करते. तसेच पोस्टर किंवा जाहिराती आणि बॅनर्स छापणाऱ्या व्यक्तीचे नाव त्यावर असणे गरजेचे आहे. तसेच कुठल्याही खाजगी मालमत्तेचा वापर ध्वज लावण्यासाठी किंवा पोस्टर तसेच घोषणा लिहिण्यासाठी करता येत नाही.

उमेदवार हे त्यांच्या घरी किंवा कार्यालयामध्ये किंवा प्रचाराच्या वाहनांवर झेंडे किंवा बॅनर वापरू शकतात. महत्त्वाचे म्हणजे निवडणूक प्रचारादरम्यान तुम्ही टोपी तसेच मास व स्कार्फ इत्यादी परिधान करू शकतात व वितरित करण्यास परवानगी आहे. परंतु साड्या तसेच शर्ट,ब्लॅंकेट अशा वस्तूंचे वाटप करता येत नाही.

अशाप्रकारे अनेक नियम हे निवडणूक उमेदवाराला आणि निवडणूक कालावधीत महत्त्वाचे असतात.