Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

नवयुवक शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ! ‘या’ हंगामी पिकाच्या शेतीतून एका एकरात मिळवलं 5 लाखांचं उत्पन्न ; पहा सविस्तर

Farmer Success Story : अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधव आता पारंपरिक पिकांच्या शेतीपेक्षा नगदी आणि हंगामी पिकांच्या शेतीकडे अधिक लक्ष देत आहेत. हंगामी पिकांमध्ये कलिंगड या पिकाची देखील अलीकडे लागवड वाढली आहे. विशेष म्हणजे कलिंगड सारख्या अल्पकालावधीत आणि कमी खर्चात काढण्यासाठी तयार होणाऱ्या पिकाच्या शेतीतून शेतकरी अधिक उत्पन्न देखील कमवत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील पारंपारिक पिकांच्या लागवडीला फाटा देत कलिंगड या हंगामी पिकाच्या शेतीतून अवघ्या तीन महिन्यात लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. अक्षय लेंभे असे या नवयुवक तरुणाचे नाव असून या तरुणाने सुरवातीला आपल्या एक एकर शेत जमिनीत कलिंगड लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला.

सुरुवातीला कलिंगड शेतीत चांगले उत्पन्न मिळाल्यानंतर आता हा तरुण आपल्या दोन एकर शेत जमिनीत कलिंगड पिकाची शेती करत आहे. खरं पाहता अक्षय यांनी उच्च शिक्षण घेतले असून शिक्षणानंतर नोकरी ऐवजी शेतीला निवडला आहे. आणि त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी आजच्या घडीला फायद्याचा सिद्ध झाला आहे. अक्षय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या तीन वर्षांपासून कलिंगड पिकाची शेती करत आहेत.

विशेष म्हणजे कलिंगड लागवडीच्या पहिल्या वर्षी त्यांना सहा लाखांची कमाई यातून झाली दुसऱ्या वर्षी मात्र त्यांना कलिंगड पिकातून दोन लाखांचे उत्पन्न मिळू शकले. अर्थातच आतापर्यंत त्यांनी आठ लाख रुपये कलिंगड पिकातून कमावले आहेत. यावर्षी देखील त्यांनी कलिंगड पिकाची लागवड केली आहे. अक्षय यांच्या मते कलिंगड उत्पादनासाठी एकरी 50 ते 60 हजाराचा खर्च येतो आणि यातून जवळपास अडीच ते पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न सहजरीत्या मिळू शकतो.

निश्चितच उत्पन्न हे बाजारात कलिंगड पिकाला काय भाव मिळतो आहे यावर अवलंबून राहत. पण जर कलिंगडला चांगला दर मिळाला तर या पिकाची शेती फायदेशीर ठरते. मात्र तीन महिन्यात या पिकासपासून उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असल्याने याची शेती अलीकडे वाढू लागली आहे. दरम्यान अक्षय यांनी कलिंगड उत्पादित करण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला असून यामुळे उत्पादन खर्चात बचत झाली आहे. निश्चितच अक्षय यांचे हे यश इतरांसाठी प्रेरक राहणार आहे.

Watermelon Farming : शेतकऱ्यांनो, कलिंगड लागवडीचा प्लॅन आहे का? मग कलिंगडच्या सुधारित जाती माहिती करून घ्या