Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

मानलं गुरुजी ! शिक्षकाच्या नोकरीला ठोकला राम-राम सुरु केली शेती; फुलशेतीतून कमवताय दिवसाला 3 हजार, वाचा ही यशोगाथा

Farmer Success Story : गेल्या काही दशकापासून शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याचे चित्र आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून मिळणारे उत्पादन कमी झाले आहे शिवाय उत्पादित केलेल्या उत्पादनाला, मालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हेच कारण आहे की, आता शेतकऱ्यांना पारंपारिक पिकांसोबतच नवीन नगदी आणि कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची शेती करण्याचा सल्ला दिला जात आहे. काही शेतकऱ्यांनी हे तंत्र आता आत्मसात केले असून नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून, बाजारपेठेचा आढावा घेत शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. आज आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ; ‘या’ जिल्ह्यात मे महिन्यातही पडणार वादळी पाऊस ! पहा काय म्हणताय डख….

ज्यांनी फुलशेतीच्या माध्यमातून चांगली कमाई केली आहे. कल्याण तालुक्यातील मौजे पोई येथील शेतकरी गुरुनाथ सांबरे यांना झेंडू या फुल पिकाच्या शेतीतून दिवसाला तीन हजारापर्यंत चे उत्पन्न मिळत आहे. पोई आणि आजूबाजूचा परिसर तसं पाहता भात आणि भेंडी पिकाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.

मात्र गुरुनाथ यांनी या पारंपारिक पिकांना फाटा देत नवनवीन पिकांची शेती सुरू केली आहे. गुरुनाथ यांनी शिक्षक म्हणून काही काळ नोकरी देखील केली. मात्र नोकरीमध्ये मन न रमल्यामुळे त्यांनी शेती व्यवसायास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. आता शेतीमधून त्यांना चांगली कमाई देखील होत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, शेत जमिनीची खरेदी विक्री करताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्या, नाहीतर…..

आपल्या ज्ञानाचा शेतीमध्ये यथायोग्य वापर करत नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी लाखोंची कमाई करून दाखवली आहे. शेतात गवार, चवळी, सुरण, हळद, स्ट्रॉबेरी, अद्रक यासारखी पिकं घेतली आहेत. सध्या त्यांनी शेतात झेंडू फुल पिकाची शेती सुरू केली आहे. यातून त्यांना आता उत्पन्न मिळत असून थेट बाजारपेठेत आपला माल विक्री करणे ऐवजी फुल विक्रेत्यांना त्यांनी झेंडू फुलाची विक्री केली आहे.

यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळत असून दिवसाकाठी तीन हजारापर्यंतची कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांनी केवळ पारंपारिक पिकांवरच अवलंबून न राहता फुल शेती सारख्या इतर नगदी पिकांची लागवड देखील केली पाहिजे असे यावेळी नमूद केले.

हे पण वाचा :- धक्कादायक ! आता ‘या’ कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले, कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात