सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी ! फिटमेंट फॅक्टरमध्ये होणार वाढ, 18 हजार मुळवेतन थेट 26 हजारावर जाणार ; पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता येते काही दिवसात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर बाबत विचार केला जाणार आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 पट एवढा फिटमेंट फॅक्टर लागू आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांकडून 3.68 पट पर्यंत वाढ केली जावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. दरम्यान आता यावर सकारात्मक निर्णय होणार असल्याचे समजत आहे. निश्चितच याबाबत सरकारकडून कोणतीच माहिती सार्वजनिक झालेली नाही.

परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढ देण्यासाठी शासनाकडून लवकरच विचार केला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत फिटमेंट फॅक्टर 3.68 पट झाल्यास ज्या कर्मचाऱ्यांचे सद्यास्थितीला मूळ वेतन 18000 आहे त्यांचं मूळ वेतन हे 26000 होणार आहे. म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आठ हजार रुपये आणि वार्षिक 96 हजार रुपयाची वाढ होणार आहे. निश्चितच यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय?

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की फिटमेंट फॅक्टर हा मूळ वेतनशी निगडित घटक आहे. फिटमेंट फॅक्टर ही एक प्रकारची Common Value असते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की, या कॉमन वॅल्यूचा वापर कर्मचाऱ्यांचा एकूण पगार ठरवण्यासाठी केला जातो. या व्हॅल्यूचा वापर करून एकूण पगाराचा आकडा मिळवला जातो. म्हणजे एकूण पगार किती हे ठरवण्यासाठी याचा वापर होतो असा आपण म्हणू शकतो.

आता हा एकूण पगार मिळवण्यासाठी मूळ वेतनालां फिटमेंट फॅक्टरने गुणल जात. म्हणजे सध्या कॉमन फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे. याचाच अर्थ असा की, 4200 ग्रेड पेमध्ये कुणा कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 15500 रुपये आहे तर त्याचा एकूण पगार 15500 X 2.57 म्हणजेच 39835 इतका असेल.

आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की फिटमेंट फॅक्टर वाढ लागू झाली तर ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 आहे अशा कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 26,000 बनणार आहे. अशा परिस्थितीत आता त्याचा एकूण पगार जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर 26,000×3.68 म्हणजेच 95,680 रुपये अशा कर्मचाऱ्यांचा एकूण पगार राहणार आहे. निश्चितच फिटमेंट फॅक्टर वाढ लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.