Harbhara Lagwad : राज्यातील हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव ; ‘ही’ फवारणी करून मिळवा नियंत्रण, नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Harbhara Lagwad : राज्यातील शेतकरी बांधव सध्या रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात आपल्याकडे गहू, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी हंगामातील वेळेवर पेरणी केलेले हरभरा पिक घाटे लागण्याचे अवस्थेत आहे.

काही ठिकाणी हरभरा पेरणी उशिरा झाली असल्याने त्या ठिकाणी हरभरा पिक हे कळ्या आणि फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. अशातच सध्या राज्यात बहुतांशी ठिकाणी विशेषता मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर वेगवेगळ्या रोगांचे चावट पाहायला मिळत आहे. या पिकावर विशेषतः घाटे अळीचा प्रादुर्भाव हा ढगाळ हवामानामुळे होत असतो. यावेळी देखील असंच काहीसं झालं असून घाटे अळीमुळे फुलोरा अवस्थेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशा परिस्थितीत हरभरा पिकावर आलेल्या घाटे अळीवर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक बनले आहे. यामुळे आज आपण घाटेआळी वर कशा पद्धतीने नियंत्रण शेतकरी बांधव मिळू शकतात याविषयी जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या हरभरा पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पाणी व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर राहणार आहे. कारण की यामुळे पिकात पाणी साचणार नाही. हरभरा पिकात पाणी साचल्यास या अळीचा प्रादुर्भाव अजूनच वेगाने वाढण्यास मदत होते यामुळे पिकात पाणी साचणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.

सध्या राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. तसेच काही ठिकाणी दाट धुके आहे. हे तयार झालेलं वातावरण कुठे ना कुठे हरभरा पिकासाठी घातक असून यामुळे घाटे अळी मोठ्या प्रमाणात पिकावर हल्ला चढवत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावण्याचा सल्ला तज्ञ लोकांनी दिला आहे. याव्यतिरिक्त पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे हे चेक करणे देखील महत्त्वाचा आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत, यामुळे कामगंध सापळ्याकडे आकर्षित होऊन कीटक नियंत्रणात देखील मदत होईल आणि पिकावर नेमकी घाटेअळीची संख्या किती आहे याचा अंदाज बांधता येईल.

तज्ज्ञांच्या मते, हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळल्यास यावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ % इसी) २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ %) ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला तज्ञ लोकांनी दिला आहे. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांनी कोणत्याही औषधाची फवारणी करणे अगोदर जाणकार लोकांचा सल्ला घेणे महत्त्वाचे राहणार आहे.