कांदा सोडा कांद्याशी संबंधित ‘हा’ बिझनेस करा, वर्षभरातच पैशांचा पडेल पाऊस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Ideas : आजकाल सर्वांचेच जीवन खूप बदलेले आहे. अगदी फास्ट असे जीवन झाले आहे. आजच्या जीवनशैलीत कुणाला जास्त टाइम देखील मिळत नाही. अशा परिस्थिती लोंकाना आयत्या मिळणाऱ्या वस्तूंची, पॅकेजिंग मटेरियलची खूप सवय झाली आहे.

महिला देखील आजकाल रेडी माँट्रियल स्वयंपाकासाठी खरेदी करताना दिसतात. हीच एक व्यवसायाची मोठी संधी आहे. कांदा हा स्वयंपाकात लागणारी मूलभूत गोष्ट आहे. कांद्याच्या पेस्टशिवाय जेवणाला चव येत नाही. त्यामुळे आता रेडिमेड कांद्याच्या पेस्टला मागणी वाढली आहे.

थेट कांद्याची पेस्ट विकत घेतल्याने त्यांची खूप मेहनत आणि वेळ वाचतो. त्यामुळे याची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही हा व्यवसाय करून पैसे कमावू शकता. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही. यामध्ये तुम्ही कमी पैसे गुंतवूनही मोठी कमाई करू शकता. या व्यवसायासाठी, आपणास केवळ ओनियन प्रोसेसिंग युनिट लावावे लागेल.

* कसा व किती होऊ शकता फायदा

अनेकदा कांद्याचे भाव वाढत असतात. त्यामुळे कांद्याला मागणी अचानक कमी होते. अशा वेळी लोक पेस्ट वापरतात. कारण ती लोकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असते. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सर्वात मोठा विषय असतो तो म्हणजे भांडवल.

कांद्याची पेस्ट बनवण्याच्या व्यवसायावर खादी ग्रामोद्योग आयोगाने एक प्रकल्प तयार केला आहे. यानुसार तुम्ही 4.19 लाख रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही पूर्ण क्षमतेने कांद्याची पेस्ट तयार केली

तर तुम्ही एका वर्षात सुमारे 7.5 लाख रुपयांची विक्री करू शकता. सर्व खर्च वजा जाता तुम्हाला सुमारे 1.75 लाख रुपये राहतील. व्यवसाय जसजसा वाढेल तसतसा हा राहणारा नफा देखील वाढत जाईल.

* व्यवसायासाठी इतर महत्वाच्या गोष्टी

व्यवसायासाठी आणखी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या प्रोडक्टचे पॅकेजिंग. कांद्याची पेस्ट बनवल्यानंतर त्याची आकर्षक पॅकेजिंग करणे फार महत्वाचे आहे. आजकाल लोक आकर्षक पॅकेज पाहून प्रोडक्ट खरेदी करतात, त्यामुळे चांगले पॅकेजिंग असलेली उत्पादने अधिक विकली जातात.

यानंतर येतो महत्वाचा मुद्दा म्हणजे मार्केटिंग. उत्तम व्यवसायासाठी तुम्हाला खास मार्केटिंग करणे देखील गरजेचे आहे. योग्य जाहिरात, मार्केटिंग करून तुम्ही तुमचा बिझनेस घरोघरी पोहोचू शकता.