Magel Tyala Shettale Anudan : मागेल त्याला शेततळे अनुदानात 25 हजाराची वाढ ; महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Magel Tyala Shettale Anudan : खरं पाहता कोरोनापासून मागेल त्याला शेततळे योजना बंद झाली होती. मात्र आता ही योजना पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या स्वरूपात आणि नावात आता मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता मागेल त्याला शेततळे योजना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या नवीन नावाने सुरू करण्यात आली आहे.

तसेच या योजनेअंतर्गत आता अनुदानात वाढ झाली आहे. आधीच्या तुलनेत 25 हजाराची वाढ अनुदानात करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून यंदा संपूर्ण महाराष्ट्रात 13,500 शेततळे बनवण्याचे उद्दिष्टे महाराष्ट्र राज्य शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, कोरोना काळात राज्य शासनाच्या तिजोरीत मोठा खळखळाट होता. अशा परिस्थितीत त्यावेळी ही योजना चालू ठेवणे म्हणजे जवळपास अशक्य बनले होते. यामुळे तत्कालीन सरकारने या योजनेला ब्रेक लावला होता. ही योजना बंद झाल्याने निश्चितच शासनाच्या तिजोरीवरील भार कमी झाला परंतु ज्या शेतकरी बांधवांना शेततळे बनविणे गरजेचे होते अशा शेतकऱ्यांच्या खिशावर भार पडला.

यामुळे सिंचनापासून राज्यातील अनेक शेतकरी वंचित राहिले. दरम्यान आता नवीन स्वरूपात, नवीन रंगात, नव्या अनुदानात ही योजना सुरू झाली असून यंदा 13,500 शेततळे संपूर्ण राज्यात या योजनेच्या माध्यमातून तयार केली जाणार आहेत. यापैकी एक हजार दहा अनुसूचित जातीसाठी, 770 अनुसूचित जमातीसाठी, 11,720 सर्वसाधारण गटासाठी अशा पद्धतीने शेततळ्याचा लाभ शेतकऱ्यांना देऊ केला जाणार आहे.

जस की आपणास ठाऊकच आहे की आधी मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेअंतर्गत 50 हजाराच अनुदान शेतकऱ्यांना मिळत होत. मात्र आता यामध्ये वाढ झाली असून 75 हजाराच अनुदान शेतकऱ्यांना देऊ केल जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लाभार्थी शेतकऱ्यांना दिल जाणार अनुदान हे आयुक्तालय स्तरावरून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे.

ही मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कृषी योजना खरं पाहता मार्च 2022 मध्ये सुरू झाली. परंतु त्यावेळी योजनेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी झाल्या नव्हत्या. मात्र आता या योजनेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. यामुळे या योजनेला गती लाभणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना केले जात आहे. या वैयक्तिक शेततळे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 60 गुंठे शेत जमीन असणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी शेततळे योजनेचा लाभ घेतलेला नसावा. दिव्यांग शेतकऱ्यांना तसेच महिला शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.