म्हाडा मुंबई लॉटरी : 50 हजार पगार असलेल्या लोकांनाही Mhada चे अत्यल्प गटातील घर दुरून डोंगर साजरेच, आता पर्याय काय? घरासाठी किती कर्ज मिळू शकत? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada Mumbai House Price : मुंबईमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना म्हाडाने एक मोठी भेट दिली आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या माध्यमातून नुकतीच 4 हजार 83 घरांसाठी सोडत जारी करण्यात आली आहे. या सोडतीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील 22 मे 2023 पासून सुरू झाली आहे. खरं पाहता 2019 मध्ये मुंबई मंडळाने याआधी सोडत काढली होती. तेव्हापासून मुंबई मंडळाची लॉटरी काही निघाली नाही.

त्यामुळे या सोडतीकडे मुंबईमध्ये घर घेणाऱ्या लाखो लोकांचे लक्ष लागून होते. दरम्यान आता ही सोडत जाहीर झाली आहे. मात्र या निमित्ताने एक ना अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. वास्तविक म्हाडा सर्वसामान्य लोकांसाठी घर उपलब्ध करून देत असते. मात्र मुंबई मंडळाच्या या नवीन घर सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांच्या किमती म्हाडाची सोडत सर्वसामान्यांसाठी आहे की श्रीमंतांसाठी हा मोठा प्रश्न उपस्थित करत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच जाहीर झालेल्या म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 83 सदनिकांच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2790 घरांचा समावेश करण्यात आला आहे. या उत्पन्न गटात समाविष्ट असलेल्या घरांच्या किमती मात्र 30 ते 40 लाखांच्या घरात आहेत. यामुळे जे सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांना 20 ते 25 हजार रुपये मासिक पगार आहे त्यांना ही घरे कशी परवडणार? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. म्हाडाच्या या नवीन सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किमान किंमत तीस लाख रुपये आहे.

जर समजा एखाद्याचा पगार मासिक पंचवीस हजार रुपये आहे आणि त्याला हे घर लॉटरीमध्ये मिळाले तर अशा लाभार्थ्याला तेरा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेकडून मंजूर होऊ शकते. म्हणजेच त्याला मुद्रांक शुल्कासह हे घर मिळवण्यासाठी आणखी 20 लाखांची तजवीज करावी लागणार आहे. म्हणून मासिक पंचवीस हजार रुपये पगार असलेली व्यक्ती एवढ्या पैशांची तत्त्वेज कुठून करणार हाच मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत जरी एखाद्या व्यक्तीला म्हाडाचे हे घर लॉटरीमध्ये मिळाले तरीदेखील अशा मध्यमवर्गीय आणि गरजू लोकांना या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

मासिक 50 हजार वेतनधारकास अत्यल्प उत्पन्न गटातील घरे परवडणार नाहीत?

अत्यल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच ज्या व्यक्तीच मासिक उत्पन्न 50 हजार रुपये आहे अशा लोकांसाठी या सोडतीमध्ये 2790 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. मात्र या घरांच्या किमती 30 ते 40 लाखांच्या घरात आहेत. या अत्यल्प उत्पन्न गटातील घरांमध्ये वडाळा सीजीएस कॉलनीतील घराचा समावेश असून याची किंमत 40 लाख रुपये आहे. तसेच गोरेगाव पहाडी येथील घरांची किंमत 30 लाख 44 हजार एवढी आहे. तर विक्रोळी कन्नमवारमधील घरांची किंमत 34 ते 36 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

तर विखुरलेली दोन घर चांदिवलीमध्ये आणि मानखुर्दमध्ये आहे. या चांदीवलीच्या घराची किंमत 25 लाख आणि मानखुर्दच्या घराची किंमत 26 लाख रुपये आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीच मासिक उत्पन्न किंवा पगार 50 हजार रुपये आहे आणि या व्यक्तीला या लॉटरीमधील अत्यंत उत्पन्न गटातील घर मिळाले तर अशा व्यक्तीला बँकेकडून 29 लाखापर्यंतचा कर्ज मिळेल आणि या व्यक्तीला पाच लाखापासून ते बारा लाखापर्यंतची तजवीज स्वतःच करावी लागणार आहे.

तसेच 20 ते 25 हजार रुपये पगार असलेल्या व्यक्तीला 10 ते 13 लाखापर्यंत कर्ज बँकेकडून मिळेल आणि त्याला उर्वरित रक्कम म्हणजेच जवळपास 20 ते 25 लाख रुपये स्वतः जमवावे लागणार आहेत. एकंदरीत म्हाडाची घरे दुरून डोंगर साजरे अशीच गंमत झाली आहे. दरम्यान आज आपण म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती तसेच यासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल? आणि एखाद्या नोकरदार व्यक्तीला किती कर्ज बँकेकडून त्याच्या पगारानुसार मिळू शकत? याबाबत आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती पगारावर किती कर्ज

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस हजार रुपये मासिक पगार असलेल्या व्यक्तीला बँकेकडून दहा लाख 44000 पर्यंतचे कर्ज मिळू शकते.

25000 मासिक पगार असलेल्या व्यक्तीला 13 लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते.

50 हजार मासिक पगार असलेल्या व्यक्तीला 29 लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते.

अत्यल्प उत्पन्न गटातील घरे आणि त्यांच्या किमती

मुंबई मंडळाच्या 4 हजार 83 सदनिकांच्या सोडतीत पहाडी गोरेगाव पश्चिम येथील 1947 घरांचा समावेश असून घरांची किंमत 30 लाख 44 हजार रुपये एवढी आहे. यासाठी दहा हजार पाचशे नव्वद रुपये डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

यामध्ये वडाळा अँटॉप हिल सीजीएस कॉलनी येथील 417 घरांचा समावेश असून या घराची किंमत 40 लाख एवढी आहे. अनामत रक्कम म्हणून या घरांसाठी 25 हजार 590 रुपये भरायचे आहेत.

कन्नमवार नगर विक्रोळी येथील 166 घरांचा समावेश या अत्यल्प उत्पन्न गटात करण्यात आला आहे. याची किंमत 34 लाख 74 हजार असून अनामत रक्कम पंचवीस हजार 590 रुपये आहे.

कन्नमवार नगर विक्रोळी येथील आणखी 258 घरांचा समावेश असून या घराची किंमत 36 लाख 16 हजार रुपये असून अनामत रक्कम 25 हजार 590 ठेवण्यात आली आहे.

यासोबतच चांदीवली येथील एका घराचा समावेश अत्यल्प उत्पन्न गटात असून याची किंमत 24 लाख 71 हजार 733 रुपये आहे. यासाठी 25 हजार 590 अनामत रक्कम ठेवण्यात आली आहे.

यामध्ये मानखुर्द येथील एका घराचा समावेश आहे. याची किंमत 26 लाख 26 हजार 254 ठेवण्यात आली असून अनामत रक्कम 25 हजार 590 आहे.

एकंदरीत म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी सामान्य नागरिकांना कर्ज मंजूर झाल्यानंतरही लाखो रुपयांची तजवीज स्वतः करावी लागणार आहे. यासाठी सामान्य व्यक्तींना आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून पैशांची जमवाजमव करावी लागणार आहे तरच या घरांचे स्वप्न साकार होणार आहे. अन्यथा ही घरे सर्वसामान्यांना परवडणार नाहीत असे चित्र तयार झाले आहे.