MHADA : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार! मात्र 14 लाखात म्हाडा ठाणे, वसई-विरारमध्ये घर देणार, सोडतीसाठी अर्ज सुरु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHADA : ठाणे वसई विरार मध्ये आपले हक्काचे घर करू पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. म्हाडाच्या माध्यमातून आता सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळांने सर्वसामान्यांचीं मागणी लक्षात घेता घर सोडतीसाठी नोंदणी प्रक्रिया प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे.

20 फेब्रुवारीपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून ठाणे वसई विरार या मुंबईच्या उपनगरात आपले स्वप्नातील घर पूर्ण करण्याचीं सुवर्णसंधी सर्वसामान्यांसाठी चालून आली आहे. 4752 घरांची सोडत म्हाडाच्या माध्यमातून राबवली जाणार असून नव्या नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून 20 फेब्रुवारीपासून यासाठीचीं आवश्यक प्रक्रिया राबवली जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 20 फेब्रुवारीपासून घराच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठीची जी अनामत रक्कम आहे ती अनामत रक्कमसह 20 मार्चपर्यंत अर्ज नव्या नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून सादर करता येणार आहेत. यानंतर 11 एप्रिल रोजी घराची सोडत ही जारी होणार असून यानंतर मग लॉटरीमध्ये निवड झालेल्या लोकांना उर्वरित रक्कम भरून घराच्या चाव्या मिळणार आहेत.

या ठिकाणी विशेष बाब अशी की, कोकण मंडळांतर्गत पंतप्रधान आवास योजना, खाजगी विकासकांची घरे आणि म्हाडाची घरे अशी एकत्रित घरांची सोडत किंवा लॉटरी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. म्हणजे पंतप्रधान आवास योजना खाजगी विकास कामांची घरे आणि म्हाडाचीं घरे अशी एकत्रित 4752 घरांची सोडत यावेळी कोकण महामंडळाअंतर्गत जारी होणार आहे. म्हणजे यामध्ये खाजगी विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या 1554 घरांचा समावेश आहे.

या सोडतीच्या माध्यमातून वसई, विरार, ठाणे, पाचपाखाडी, डायघर, सानपाडा, घणसोली या ठिकाणी लोकांना घर उपलब्ध होणार आहेत. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाच्या व्यक्तींसाठी ही सोडतीची प्रक्रिया आहे. या तिन्ही उत्पन्न गटाच्या व्यक्तींसाठी घरांची किंमत 14 लाख ते 30 लाख रुपये एवढी मंडळाच्या माध्यमातून ठरवण्यात आली आहे.

यामुळे अत्यल्प उत्पन्न गट मध्ये मोडणाऱ्या लोकांना मात्र 14 लाखात या ठिकाणी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. नवीन सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून घरासाठी नोंदणी केली जाणार आहे. यामुळे पात्र व्यक्तींनाच अर्ज करता येणार आहे. लॉटरी मध्ये नाव आलेल्या लोकांना एका वर्षाच्या आत घराचा ताबा देण्यासाठी या नव्या नोंदणी प्रक्रियेचा फायदा होणार आहे.

या ठिकाणी उपलब्ध होणार घर

शिरढोण येथे अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना 340 घरांसाठी सोडत जारी होईल आणि 14 लाख 96 हजार रुपये इतकी किंमत या ठिकाणी घरांची राहणार आहे.

खोनी येथे अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना 60 घराची सोडत जारी होणार आहे या ठिकाणी 17 ला 68 हजार रुपये इतकी किंमत घरांची राहणार आहे.

गोठेकर येथे अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी 256 घराची सोडत जारी होणार आहे. या ठिकाणी 17 लाख 15 हजार इतकी घराची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

विरार येथे अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी 984 घराची सोडत जारी होणार आहे. मात्र घराची किंमत 21 लाख 15 हजार निश्चित झाली आहे. याशिवाय विरार येथे अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी 59 घरांची सोडत जारी होणार असून किंमत 28 लाख रुपये इतकी निश्चित झाली आहे.

बाळकुम या ठिकाणी उच्च उत्पन्न गटांसाठी घराची सोडत राहणार आहे या उच्च उत्पन्न गटांसाठी केवळ तीन घरे या ठिकाणी राहतील आणि घराची किंमत साठ लाख साठ हजार इतकी राहणार आहे.