मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai New Vande Bharat Train : कोल्हापूर येथे करवीर निवासिनी अंबाबाईच शक्तीपीठ आहे. तसेच कोल्हापूर पर्यटनात्मकदृष्ट्या मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात राज्यातून तसेच सबंध देशभरातून लाखो पर्यटक तसेच भाविक दाखल होत असतात.

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राजधानी मुंबई येथून देखील रोजाना हजारो भाविक कोल्हापुरात येतात. शिवाय राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोल्हापूर येथून देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी रोजाना प्रवास करतात.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर ते मुंबई दरम्यान प्रवास गतिमान करण्यासाठी देशातील सर्वात जलद सुपरफास्ट ट्रेन अर्थातच वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

हे पण वाचा :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ निर्णय, मिळणार मोठा आर्थिक लाभ, पहा डिटेल्स

मात्र आतापर्यंत प्रवाशांच्या या मागणीवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा होत नसल्याचे चित्र होते. पण खासदार उदयनराजे भोसले यांनी आता या संदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे. उदयनराजे यांनी कोल्हापूर-मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांच्याकडे नुकतीच केली आहे.

वास्तविक मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर हे एक महत्वाचे शहर आहे मात्र कोल्हापूरहुन मुंबईसाठी सध्या फक्त दोनच एक्सप्रेस धावतात. दुसरीकडे मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागातील वाहतूककोंडी फुटणार, मुंबई महानगरपालिका विकसित करणार नवीन फ्लायओव्हर, पहा…..

सोलापूर आणि शिर्डी प्रमाणेच कोल्हापूर हे देखील महत्त्वाचे शहर आहे. यामुळे या देखील मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी आहे. दरम्यान आता खासदार उदयनराजे भोसले यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे यासंदर्भात मागणी केली आहे.

शिवाय उदयनराजेंनी कोरोना पासून बंद पडलेल्या कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेसला देखील लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी यावेळी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे. यामुळे आता उदयनराजेंनी केलेल्या या मागण्या मान्य होतात का? आणि कोल्हापूरवासियांचा मुंबईकडील प्रवास जलद होतो का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा :- 10वी पास, ग्रॅज्युएट तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स विभागात निघाली ‘या’ पदासाठी भरती, आजच करा अर्ज