Nagpur Goa Expressway : 70,000 कोटी खर्चाच्या 760 किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाला लाभली गती, ‘या’ दिवशी सल्लागार समितीची होणार निवड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur Goa Expressway : डिसेंबर 2022 मध्ये मुंबई-नागपूर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे अर्थातच समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा पूर्ण झाला असून या चालू वर्षातील डिसेंबर अखेर या महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते मुंबई पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान याच महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्रात अजून एक मोठ्या महामार्गाची निर्मिती होत आहे. नागपूर गोवा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे असे या महामार्गाचे नाव. खरं पाहता हा महामार्ग तीन शक्तीपीठांना जोडत असल्याने या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग म्हणून संबोधल जाऊ लागल आहे.

दरम्यान आता या शक्तीपीठ महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आला आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार या महामार्गासाठी आवश्यक सल्लागार संस्थेची निवड येत्या आठवड्याभरात होणार आहे. निश्चितच सल्लागार समिती निवड झाल्यानंतर या महामार्गाच्या कामाला मोठी गती लाभणारं आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शक्ती पीठ महामार्ग हा 760 किलोमीटर लांबीचा असून या मार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या चार विभागातून हा महामार्ग जात असल्याने महाराष्ट्राचा एकात्मिक विकास करण्याची ताकद यामध्ये असल्याची बतावणी शासनाकडून केली जात आहे.

हा महामार्ग महाराष्ट्रातील एकूण दहा जिल्ह्यांना कनेक्ट करणार असून गोव्यातील पत्रादेवी या जिल्ह्याला देखील जोडणारा आहे. यासाठी एकूण 70 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शक्तीपीठ एक्सप्रेस वेमुळे विदर्भातून गोव्यात जाण्यासाठी निम्म्याहून कमी वेळ लागणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या पर्यायाने प्रवास केल्यास नागपूर ते गोवा हे अंतर सुमारे 22 तासांचा कालावधी लागतो.

नव्या महामार्गाच्या उभारणीनंतर नागपूर ते गोवा हे अंतर 10 तासाहून कमी कालावधीत पार करता येणार आहे. तसेच विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मोठ्या बाजारपेठा उपलब्ध होणार आहे. दरम्यान या मार्गासाठी सुसाध्यता आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती या आठवड्यात केली जाणार आहे.

या महामार्गामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. कारण की हा महामार्ग सेवाग्राम आश्रम, कारंजा लाड, माहूरगड, औंढा नागनाथ, नांदेड, परळी वैजनाथ, अंंबेजोगाई, लातूरचा सिद्धेश्वर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, नरसोबाची वाडी, कोल्हापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही धार्मिक पर्यटन स्थळे जोडली जाणार आहेत.

निश्चितच यामुळे महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला मोठा वाव मिळणार असून उद्योगाची मोठ्या प्रमाणात निर्मिती होईल आणि याचा कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या विकासात हातभार लागेल.