नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग : 760 किमी लांबीसाठी 75,000 कोटींचा खर्च, ‘त्या’ 11 जिल्ह्यात होणार भूसंपादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur Goa Expressway : राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 11 डिसेंबर 2022 रोजी नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

तसेच दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते मुंबई हा या वर्षाखेर खुला करण्याचा टार्गेट ठेवण्यात आला आहे. याच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्रात अजून एक मोठ्या महामार्गाचे निर्मिती होत आहे. तो महामार्ग म्हणजे नागपूर गोवा महामार्ग. विशेष म्हणजे हा महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांब राहणार आहे.

हा महामार्ग तब्बल सातशे सात किलोमीटर लांब आणि महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा राहणार आहे. यामुळे सध्या या महामार्गाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. समृद्धी महामार्गामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मधील जो भाग परस्परांशी जोडला गेलेला नाही तो भाग या महामार्गाने जोडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या महामार्गावर प्रवास केल्यास नागपूर ते गोवा हे अंतर आठ तासात पार करता येणे शक्य होणार आहे. सद्यस्थितीत या दोन शहरा दरम्यान प्रवास करण्यासाठी 21 तासांचा कालावधी लागतो. निश्चितचं यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे तसेच प्रवासाला गती लाभणार आहे.

या महामार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा महामार्ग भारतातील एकूण तीन शक्तीपीठांना जोडणार आहे. महाराष्ट्रातील महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि गोव्यातील पत्रा देवी या शक्तिपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने याला शक्तिपीठ महामार्ग असं संबोधले जात आहे.

महामार्गा विषयी थोडक्यात

नागपूर गोवा महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने हाती घेतले आहे. या मार्गाला शक्तीपीठ एक्सप्रेस वे म्हणून संबोधण्यात आल आहे. हा सहा पदरी महामार्ग 760 किलोमीटर लांब राहणार असून यासाठी 75 हजार कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे.

हा मार्ग यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभनी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापुर, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (गोवा) या जिल्ह्यातून जाणार आहे. जाणकार लोकांच्या मते, हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्यांमधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.

तसेच यामुळे राज्यातील आणि गोव्यातील तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांसाठी प्रवास सोयीचा होणार आहे. यामुळे राज्यातील औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्राला मोठे लाभ मिळणार आहेत. या महामार्गामुळे धार्मिक पर्यटनाला देखील चालना लाभणार आहे.

या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोव्यातील प्रमुख धार्मिक ठिकाण जोडली जाणार आहेत. सद्यस्थितीला या महामार्गाची कामे आखणी करण्याचे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सल्लागार नेमण्यासाठी गेल्या आठवड्यात निविदा देखील रस्ते विकास महामंडळाकडून मागवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ही निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सल्लागाराची निवड केली जाणार आहे. त्यानंतर मग सल्लागाराकडून आराखडा तयार करून तो मंजूर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. एवढ झालं की मग बांधकामाची निविदा निघेल आणि त्यानंतर बांधकाम सुरू होईल. काम सुरू झाल्यानंतर पाच-सात वर्षांनी या महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे.