जनार्दनराव मानलं! संकटातून मार्ग काढत दुष्काळी पट्ट्यात फुलवली शेती; कलिंगड अन मिरचीच्या पिकातून झाली लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Farmer Earn Millions From Watermelon Farming : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या एक ना अनेक संकटांनी ग्रसलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळेही मोठा फटका बसत आहे.

आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे. निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना सुलतानी संकटांचा देखील सामना करावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे शासनाचे अनैतिक धोरण देखील अनेकदा शेतकऱ्यांसाठी घातक ठरते. परंतु या संकटातूनही बळीराजा लाखो रुपयांची कमाई शेती मधून करत आहे.

नासिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात या नैसर्गिक आणि सुलतानी संकटांचा सामना करत एका प्रयोगशील शेतकऱ्याने कलिंगड आणि मिरची पिकाच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. निश्चितच शेतकऱ्यांच्या पुढ्यात असलेले संकट मोठं आहे, पण शेतकऱ्यांकडे असलेली इच्छाशक्ती या संकटांवर वरचढ ठरत असून नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून प्रगतिशील शेतकऱ्यांनी लाखोची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शक काम केला आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान! अवकाळीचे संकट अजून गेले नाही; आता ‘या’ दिवशी पडणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा इशारा

येवला तालुक्यातील ममदापूर येथील जनार्दन उगले यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर विविध नैसर्गिक संकटांचा सामना करून कलिंगड आणि मिरचीच्या शेतीतून चांगली कमाई केली आहे. खरं पाहता येवला तालुका कांदा उत्पादनासाठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. मात्र कांदा पीक हे बेभरवशाच पीक आहे. यातून अनेकदा चांगली कमाई होते तर अनेकदा केलेला खर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत जनार्दन यांनी कांदा पिकाला फाटा देत कलिंगड आणि मिरचीची आंतरपीक शेती सुरू केली.

जनार्दन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या एका एकरात कलिंगड पिकाची लागवड केली आणि त्यामध्ये फिकट आणि तिखट अशा दोन प्रकारच्या मिरच्या लावल्या. या पिकासाठी त्यांनी शेततळ्यामधील पाण्याचा उपयोग केला. पीक लागवड केल्यानंतर योग्य व्यवस्थापन करण्यात आले आणि हेच कारण आहे की आता मिरचीचे पीक तयार झाले आहे. यातून त्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; महाराष्ट्रात यंदा उष्णतेची लाट, महापुर आणि दुष्काळ पडणार, आता ‘या’ संस्थेने दिला गंभीर ईशारा

फिकट मिरची 30 रुपये प्रति किलो आणि तिखट मिरची पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत बाजारात विक्री होत आहे. यामुळे मिरचीच्या पिकातून जवळपास चार ते साडेचार लाखांची कमाई होण्याची आशा त्यांना आहे. सोबतच कलिंगड पीक देखील काढण्यासाठी तयार झाले असून यातून त्यांना जवळपास 30 टन कलिंगड मिळणार आहे. दहा रुपये प्रति किलो असा कलिंगडचा व्यवहार झाला असून तीन लाखांची कमाई कलिंगड मधून होणार आहे.

या एक एकरासाठी कलिंगड आणि मिरची पीक उत्पादन करता जवळपास दोन ते अडीच लाखांचा खर्च आला आहे. एकूणच सात ते साडेसात लाखांची कमाई त्यांना होणार असून खर्च वजा जाता चार ते पाच लाखांचे निव्वळ उत्पन्न या पिकातून त्यांना मिळणार आहे. निश्चितच दुष्काळीपट्ट्यात केलेला हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे. शेतीमध्ये केवळ पारंपारिक पद्धतीने न राबता आता आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक असल्याचे या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्याचा नाद नाही करायचा ! वर्ध्याच्या युवा शेतकऱ्याने शेतात बनवलं फाइव्ह स्टार मचान; पंचक्रोशीत रंगली एकच चर्चा, पहा….