पंजाबरावांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात राहणार अवकाळी?, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : राज्यात या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हवामानात मोठा बदल झाला आहे. जवळपास चार मार्चपासून राज्यात गारपीट अन अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

धुळे जिल्ह्यातील काही भागात, नाशिक जिल्ह्यातील काही भागात, अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे. विशेष म्हणजे गारपीट अन पाऊस भाग बदलत 20 मार्चपर्यंत पडत होता. दरम्यान आता कालपासून राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे.

हे पण वाचा :- नोकरीला भारी शेती ! पुण्याच्या शेतकऱ्याचा कोथिंबीर लागवडीचा प्रयोग यशस्वी; अर्धा एकरात एक लाखाची कमाई

असं असले तरी काल राजधानी मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात मुसळधार पावसाची हजेरी होती. तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भागात ढगाळ हवामान देखील पाहायला मिळाले. अशातच हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात 24 आणि 25 रोजी हवामानात थोडासा बदल होणार आहे.

या दोन दिवशी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. मात्र पाऊस पडणार नसल्याचे डख यांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांना सल्ला देताना डखं यांनी सांगितलं की, 5 एप्रिल पर्यंत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गव्हाची आणि हरभऱ्याची हार्वेस्टिंग करून घ्यावी. कारण की 5 एप्रिल नंतर पुन्हा एकदा हवामान खराब होणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्याचा सूर्यफूल लागवडीचा प्रयोग ठरला फायदेशीर; 3 महिन्यात झाली 2 लाखांची कमाई

एकंदरीत 5 एप्रिल नंतर पावसाची राज्यात शक्यता असल्याचा अंदाज डख यांनी बांधला आहे. याबाबत मात्र त्यांनी तूर्तास प्राथमिक स्वरूपाचा अंदाज वर्तवला असून कोणत्या जिल्ह्यात या कालावधीमध्ये पाऊस पडेल याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच याबाबत देखील माहिती त्यांच्याकडून दिली जाणार आहे. एकंदरीत पुढील महिन्यातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांची लवकरात लवकर काढणी करून घेणे आवश्यक राहणार आहे. वास्तविक राज्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा काढला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती, अशा शेतकऱ्यांचा गहू आणि हरभरा अजूनही वावरातच आहे. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांनी आपली सोंगणीची कामे जलद गतीने पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! केमिकल टाकले की बंद पडलेल्या बोअरलाही येते पाणी; सोलापूरच्या विशालच ‘विशाल’ संशोधन, गडकरींनीही…