Panjabrao Dakh : पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कानमंत्र ! जूनमध्ये सोयाबीन पेरणी करत असाल तर ‘या’ जातीचीं निवड करा, अन उशीर होत असेल तर…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Soyabean Variety : परभणीचे ज्येष्ठ हवामान तज्ञ आणि शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोलाचा सल्ला देऊ केला आहे. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांचा हा सल्ला फायदेशीर ठरणारां आहे. खरं पाहता महाराष्ट्रात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होत असते.

राज्यातील शेतकरी बांधव प्रामुख्याने खरीप हंगामात या पिकाची सर्वाधिक पेरणी करतात. दरम्यान पंजाब रावांनी राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला देताना सांगितले की, खरीप हंगामात जर शेतकरी बांधवांना सोयाबीन पेरणी करताना उशीर होत असेल तर त्यांनी लवकर काढणीसाठी येणाऱ्या जातीची पेरणी या ठिकाणी केली पाहिजे.

तसेच जर लवकरच पेरणी करत असाल तर उशिरा तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाची या ठिकाणी पेरणी शेतकऱ्यांनी केली पाहिजे. साधारणतः जून महिन्यात सोयाबीनची ही पेरणी आपल्याकडे होत असते. अशा परिस्थितीत जून महिन्यात पेरणी जर शेतकरी बांधव करत असतील तर या कालावधीत उशिरा काढणीला येणाऱ्या जातीची शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजे असं मत पंजाब रावांनी व्यक्त केल आहे.

तसेच जुलै महिन्यात जर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली तर त्यावेळी लवकर काढणीला येणाऱ्या जातीची शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजे. त्यांच्या मते, असं जर शेतकरी बांधवांनी केलं तर यामुळे अतिवृष्टी पासून सोयाबीनचे पीक वाचू शकत. खरं पाहता महाराष्ट्रात अनेकदा सोयाबीन ऐन काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टी झाली आहे. यामुळे पंजाब रावांनी हा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. याशिवाय त्यांनी काही शिफारशीत जातींची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी बांधवांनी फुले किमया आणि फुले संगम या राहुरी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाची पेरणी केली पाहिजे. तसेच परभणी विद्यापीठाने तयार केलेली परभणी 612 ही जात देखील फायदेशीर ठरणार असून या जातीची पेरणी केल्यास मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल. पंजाब रावांनी परभणी 612 या जातीच्या काही विशेषता देखील सांगितल्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जात सलग पंधरा दिवस जरी अतिवृष्टी सदृश्य पाऊस राहिला तरी देखील तग धरून राहते.

म्हणजे या जातीच्या शेंगा फुटत नाहीत. ही जात एकरी 14 ते 17 क्विंटल पर्यंत यील्ड म्हणजे उत्पादन देण्यास सक्षम आहे. या जातीची पेरणी 18 इंचावर करणे फायदेशीर ठरते आणि एकरी 27 किलो पर्यंत या वाणाचे बियाणे शेतकरी बांधवांनी पेरले पाहिजे. अशी माहिती डख यांनी यावेळी दिली आहे.

यासोबतच, पंजाबरावांनी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या लवकर काढणीसाठी तयार होणाऱ्या आणि उशिरा काढणीसाठी तयार होणाऱ्या अशा दोन्ही जातींची शेतात पेरणी करण्याचा सल्ला यावेळी दिला आहे. निश्चितच डखं यांनी दिलेला हा सल्ला शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या जातीची निवड करण्यापूर्वी कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे.

Panjabrao Dakh News : पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कामाचा सल्ला ! येत्या खरीप हंगामात ‘हे’ काम करा, लाखोत कमाई होणार