पुणे, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! Pune-Mumbai थेट विमानसेवा ‘या’ दिवशी सुरू होणार; असे राहणार तिकीट दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune-Mumbai Flight Ticket Rate : देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. दरम्यान आता या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातीप्राप्त असलेल्या पुणे ते ग्लोबल पर्यटन स्थळ आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर मुंबई या दरम्यानचा प्रवास आता सोयीचा होणार आहे. या दोन्ही शहरादरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार आहे.

यामुळे या दोन्ही शहरांदरम्यान रोजाना प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या स्थितीला मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रेल्वे मार्ग अन रस्ते मार्ग उपलब्ध आहेत. नुकतीच मध्य रेल्वेच्या टाक्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेसची सेवा देखील या प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे धावत असल्याने यामुळे मुंबई ते पुणे चा प्रवास सोयीचा झाला आहे.

हे पण वाचा :- राज्यातील शेतकऱ्यांना ‘या’ योजनेअंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी मिळणार पावणेतीन लाखांच अनुदान; अर्ज करण्याची पद्धत आणि पात्रता…

मात्र असे असले तरी बाय रोड तसेच रेल्वे मार्गे प्रवास करण्यासाठी जवळपास चार तासांचा कालावधी प्रवाशांना खर्च करावा लागतो. मात्र आता हा प्रवासाचा कालावधी केवळ एका तासात पूर्ण होणार आहे. पुणे ते मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार असल्याने विमानाने प्रवास केल्यास मात्र एका तासात पुण्याहून मुंबई दरम्यानचा प्रवास शक्य होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वास्तविक, पुणे ते मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरात दरम्यान थेट विमान सेवा सुरू केली जावी अशी प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आता ही मागणी पूर्ण झाली आहे. एअर इंडिया च्या माध्यमातून 26 मार्चपासून या दोन्ही शहरांदरम्यान विमानसेवा बहाल केली जाणार आहे. ही दोन्ही शहरे केवळ राज्याच्या दृष्टीनेच नाही तर देशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत.

हे पण वाचा :- ब्रेकिंग! राज्य शासनानंतर आता केंद्राने नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; वित्त मंत्री सीतारामन यांची माहिती

या दोन्ही शहरांना मोठा ऐतिहासिक वारसा असून ही दोन्ही शहरे औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यटनात्मक दृष्ट्या अति महत्त्वाची आहेत. मात्र तरीही या दोन्ही शहरांदरम्यान थेट विमान सेवा सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे या दोन्ही शहरांदरम्यान विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी अनेकांनी केली. यासाठी राजकारणातून, समाजकारणातून तसेच सामान्य जनतेमधून देखील कायमच मागणी पाहायला मिळाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता एअर इंडियाने 26 मार्चपासून या शहरा दरम्यान विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी लागणारा तीन तासांचा कालावधी मात्र एक तासावर येणार आहे. वास्तविक या दोन्ही शहरांदरम्यान थेट विमानसेवा याआधी होती मात्र 2019 मध्ये ही विमान सेवा बंद करण्यात आली. पण आता 26 मार्चपासून पुन्हा एकदा या मार्गावर विमानसेवा बहाल होणार आहे. 

हे पण वाचा :- पुण्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी मिळणार नुकसान भरपाई, पशुसंवर्धन विभागाची माहिती

कसे राहणार वेळापत्रक

या मार्गावरील विमानसेवा आठवड्याचे सहा दिवस चालू राहणार आहे. शनिवारी मात्र या रूटवर विमान सेवा बंद असेल. हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावरून सकाळी 11.20 वाजता निघून मुंबईत 12.20 वाजता पोहोचणार आहे. दरम्यान 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या या विमानसेवेसाठी बुकिंग आतापासूनच सुरू झाले आहे. निश्चितच एअर इंडियाचा हा निर्णय पुणेकरांना आणि मुंबईकरांना दिलासा देणारा राहणार आहे.

किती राहणार तिकीट

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट ने दिलेल्या माहितीनुसार पुणे ते मुंबई दरम्यान विमानाने प्रवास करण्यासाठी इकॉनॉमिक क्लासचे तिकीट दर 2237 रुपये राहणार आहेत. तर बिझनेस क्लास मधला तिकीट दर 18 हजार 467 रुपये इतका राहणार आहे.

हे पण वाचा :- धक्कादायक! संपात सामील झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय, ‘हे’ परिपत्रक झाले निर्गमित