पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार? ‘या’ 8 तालुक्याचा तयार होणार नवीन शिवनेरी जिल्हा, तालुक्याची आणि गावांची यादी पहा एका क्लिकवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : पुणेकरांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता 2014 पूर्वी पुणे जिल्हा हा लोकसंख्येच्या दृष्टीने राज्यातील दुसरा सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याचा मोठा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि पालघर हा नवीन जिल्हा तयार झाला. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या कमी झाली. परिणामी ठाणे हा राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बनला आणि पुणे हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठरला.

सध्या पुणे जिल्ह्याची अंदाजीत लोकसंख्या 80 लाखाच्या वर गेली आहे. निश्चितच जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय, प्रशासकीय कामांसाठी कायमचं अडचणींचा सामना करावा लागतो.

हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस पाठोपाठ आता देशात वंदे भारत इलेक्ट्रॉनिक व्हेईकलही धावणार सुसाट; किंमत अन विशेषता आहेत खूपच खास, पहा….

लोकसंख्या अधिक असल्याने जिल्हास्तरावर अनेक शासकीय योजनेची अंमलबजावणी करताना देखील वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहे. अशातच आता भाजपचे भोसरीचे खासदार महेश लांडगे यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे.

विशेष म्हणजे महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतानाच जिल्हा विभाजनाचा मुद्दा छेडला आहे. या कार्यक्रमात महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन शिवनेरी जिल्हा तयार करावा अशी मागणीच केली आहे.

हे पण वाचा :- होम लोन घेताय ना ! मग यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

सत्तेत असलेल्या भाजप पक्षाच्या आमदारानेच ही मागणी केली असल्याने या मागणीवर आता वेगवेगळ्या चर्चा देखील रंगल्या आहेत. एकंदरीत जिल्हा विभाजनाच्या या मुद्द्याला या मागणीमुळे फोडणी मिळाली आहे. भाजप आमदाराच्या या मागणीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, आज आपण जर पुणे जिल्ह्याचे विभाजन झाले तर पुणे जिल्ह्यात कोणते तालुके समाविष्ट राहतील आणि नवीन शिवनेरी जिल्ह्यात कोणते तालुके समाविष्ट राहतील या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- जगातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म हिंदुस्थानात ! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे नाव, कोणते आहे ते स्टेशनं, पहा

पुणे जिल्ह्यात कोणते तालुके?

पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास हवेली, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, पुणे शहर यांचा समावेश केला जाऊ शकतो. आमदार लांडगे यांनी देखील पुणे जिल्ह्यात याच तालुक्यांचा समावेश केला जावा अशी सूचना या मागणीच्या निमित्ताने केली आहे.

शिवनेरी जिल्ह्यात कोणते तालुके?

नवीन शिवनेरी जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश करावा अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री महोदय यांच्या पुढ्यात केली आहे. नव्या शिवनेरी जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, देहू आळंदी, शिक्रापूर यांच्यासह जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ या आठ तालुक्यांचा समावेश असावा अशी मागणी लांडगे यांनी यावेळी केली आहे.

एकंदरीत भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुणे जिल्ह्याच्या विभाजनाच्या मागणीमुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगत आहेत. अनेक राजकीय व्यक्तींनी राजकीय हेतूतून जिल्हा विभाजनाची मागणी केली जात असल्याचे सांगितले आहे. तर याबाबत महेश लांडगे यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं आणि ही मागणी लोकहिताची असल्याचे स्पष्ट केल आहे.

हे पण वाचा :- ठरलं ! महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या वाढणार; तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जाणार? नवीन जिल्ह्याची यादी, पहा…