पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे…! ‘हे’ 10 दिवस राज्यात पावसाळ्याप्रमाणे मुसळधार पाऊस पडणार, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Dakh : राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना आपल्या हातून रब्बी हंगाम पुरता वाया जाण्याची शक्यता आहे.

या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या मुख्य पिकांना तसेच कांदा आणि इतर फळबाग वर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाय एप्रिल महिन्यात कोसळत असलेला हा पाऊस आगामी मान्सूनवर देखील विपरीत परिणाम आणू शकतो असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी अक्षय तृतीयेच्या पर्वावर मोठा निर्णय ! ‘ही’ अपघात सुरक्षा अनुदान योजना महाराष्ट्रात लागू, 2 लाखाचा मिळणार लाभ, पहा…..

आता अवघ्या दीड महिन्यावर खरीप हंगाम येऊन ठेपला असतानाच अजूनही राज्यात पाऊस कोसळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीरपरिचित व्यक्तिमत्व आणि गेल्या दोन महिन्यांपासून ज्यांचा हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरत आहे अशा पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे.

पंजाब रावांनी राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात 24 एप्रिल पासून जवळपास दहा दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो असं मत डखं यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आज आपण 24 एप्रिल ते दोन मे पर्यंत कोणत्या भागात पंजाबरावांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ मार्गांवर विकसित होणार तीन मजली उड्डाणपुल; पहा काय आहे प्लॅन

कोणत्या भागात पडणार अवकाळी

पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 22 एप्रिल ते 29 एप्रिल पर्यंत पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता कायम राहणार आहे. यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे.

याशिवाय डख यांनी 22,26,27,28,29,30 एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागात गारपीट होण्याची देखील शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यात देखील 25, 26, 28, 29 आणि 30 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता कायम राहणार आहे.

26 एप्रिल ते 30 एप्रिल पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज डख यांनी यावेळी वर्तवला आहे.

याशिवाय 25 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत पश्चिम विदर्भात देखील अवकाळी पाऊस आणि काही भागात गारपीट होऊ शकते असं मत पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केल आहे.

हे पण वाचा :- धक्कादायक ! महाराष्ट्रात दर पाच तासात एक शेतकरी आत्महत्या; शिंदे सरकारच्या काळातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी