पंजाबराव डख हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अति-मुसळधार पावसाचा इशारा, कोसळणार अवकाळी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh News : राज्यात सध्या हवामान बदलामुळे शेतकरी धास्तावलेला आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी करण्यासाठी लगबग करत असलेला बळीराजा आता अवकाळी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. राज्यात जवळपास चार मार्चपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यंतरी अवकाळी पावसाने उघडीप दिली होती. साधारणता 10 मार्च ते 14 मार्च दरम्यान राज्यात पावसाने उघडीप दिली.

मात्र 14 मार्चपासून पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल झाला आणि अहमदनगर,पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव सह विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे मात्र रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. रब्बी हंगामातील गहू, हरभरा सोबतच केळी, पपई, डाळिंब आणि द्राक्ष पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! म्हाडाने अनामत रकमेबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर

दरम्यान, आता पावसाची उघडीप होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली असताच पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आगामी पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा आपला अंदाज सार्वजनिक केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने जारी केला आहे. यासोबतच आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले पंजाबराव डख यांनी देखील आपला हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.

हे पण वाचा :- लालपरीत महिलाराज! महिलांना एसटीमध्ये 50 टक्के तिकीट दरात सवलत; पण यामुळे नाराजगी कायमच, वाचा सविस्तर

या जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम

पंजाबरावांच्या मते, आजपासून दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामान कायम राहणार आहे. यासोबतच कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची देखील शक्यता आहे. यानंतर पुन्हा एकदा 24 आणि 25 मार्च रोजी महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. प्रामुख्याने पूर्व विदर्भात ढगाळ हवामान राहणार आहे.

यादरम्यान मात्र राज्यात पाऊस पडणार नसल्याचे मत पंजाबरावांनी व्यक्त केल आहे. याशिवाय डखं यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा हवामान मोठ्या प्रमाणात बदलणार असून पाच एप्रिल पासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. निश्चितच डक यांचा हा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांची हार्वेस्टिंग लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे राहणार आहे.

खरं पाहता, रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाची बहुतांशी काढणी पूर्ण झाली आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केलेली असेल त्यांनी आता लवकरात लवकर आपल्या पिकांची हार्वेस्टिंगची कामे पूर्ण करून घ्यावीत.

हे पण वाचा :- एसटी कर्मचाऱ्यांना मराठी नवीन वर्षात मिळणार ‘ही’ भेट; महामंडळाने घेतला निर्णय