ब्रेकिंग ! सिकंदराबाद-कोल्हापूर रेल्वे गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर; या गाडीला कुठे राहणार थांबे? पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sikandrabad Kolhapur Railway News : उन्हाळी सुट्ट्यामुळे सध्या रेल्वेमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी आहे. पर्यटन स्थळावर जाणारे पर्यटक, सुट्ट्यांमध्ये गावाकडे जाणारी प्रवासी यामुळे रेल्वेमध्ये नेहमीच्या तुलनेत अधिक गर्दी पहावयास मिळत आहे.

यामुळे मात्र रेल्वे प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेळेवर व्हावा यासाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून महत्त्वाच्या मार्गावर उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.

अशातच रेल्वेच्या पुणे विभागाकडून सिकंदराबाद-कोल्हापूर ही कुणाल स्पेशल साप्ताहिक गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जाणकार लोकांच्या मते या गाडीमुळे सांगली कोल्हापूर येथून दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, पहा…

निश्चितच गर्दीच्या कालावधीत या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. परंतु या गाडीला या मार्गावरील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे प्रवाशांकडून नाराजी देखील व्यक्त होत आहे.

पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या प्रमुख तीर्थक्षेत्रांना गाडी थांबणार नसल्याची माहिती या निमित्ताने समोर आले आहे. यामुळे या उन्हाळी हंगामातील स्पेशल गाडीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळणार नसल्याचे चित्र तयार होत आहे.

परंतु तरीही या ट्रेनमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांचा दक्षिण भारतातला प्रवास सोयीचा होणार आहे. ही २४ बोगींची विशेष गाडी जूनमध्ये चार फेऱ्या मारणार आहे. कोल्हापूर-सिकंदराबाददरम्यान जून महिन्यात ही गाडी धावणार असून याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे.

हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ रेल्वे स्थानकावर देखील मिळणार थांबा, पहा….

या गाडीला कुठं राहणार थांबा?

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून रेल्वे बोर्डाला प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार, या उन्हाळी हंगामातील विशेष गाडीला कोल्हापूर, मिरज, कुर्डुवाडी, कलबुर्गी, वाडी आणि सिकंदराबाद या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.

अर्थातच या मार्गावरील चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा असून यामुळे या संबंधित रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. अशातच मात्र कोल्हापूर-सिकंदराबाद ऐवजी कोल्हापूर-हैदराबाद ट्रेनची मागणी प्रवाशांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहे.

हे पण वाचा :- सावधान ! अवकाळी परत येतोय; ‘या’ भागात पुढील 3 दिवस कोसळणार वादळी पाऊस, तुमच्या भागात कसं राहणार हवामान?