सरकारचा दणका ! 1 रुपये किलो कांदा घेणं आणि 2 रुपयाचा चेक देण पडल महागात; ‘त्या’ ट्रेडर्सचा परवाना कायमचा रद्द, ‘या’ कायद्यामुळे झाली कारवाई, वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solapur Onion News : गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला 512 किलो कांदा विक्रीनंतर दोन रुपयाचा धनादेश एका व्यापाऱ्याकडून देण्यात आला. सोलापूर एपीएमसी मध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणामुळे मात्र सोलापूर एपीएमसीची मोठी किरकिरी झाली. एवढेच नाही तर यामुळे शासनावर देखील हल्लाबोल विरोधकांकडून तसेच शेतकरी संघटनांकडून आणि मायबाप शेतकऱ्यांकडून करण्यात आला.

यामुळे या संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वप्रथम सोलापूर एपीएमसीच्या माध्यमातून या व्यापाऱ्याचा परवाना 15 दिवसासाठी निलंबित करण्यात आला. साहजिकच परवाना 15 दिवस निलंबित करून अन्यायकारी वागणूक शेतकऱ्यांना देणाऱ्या या व्यापाऱ्यावर अपेक्षित अशी कारवाई झाली नसल्याचा आरोप देखील होत आहे. अशातच शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकरणातील संबंधित ट्रेडर्सचा परवाना कायमचा रद्द केल्याची बातमी समोर येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील राजेंद्र चव्हाण यांनी 17 फेब्रुवारी रोजी सोलापूर एपीएमसी मध्ये दहा पोती कांदा विक्रीसाठी आणला. या दहा पोत्यातील कांद्याच 512 किलो वजन भरलं. याला एक रुपये किलोचा दर म्हणजेच 100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मात्र ट्रान्सपोर्ट, हमाली, तोलाई इत्यादी खर्च वजा केला असता या 512 किलो वजनाच्या कांद्याच्या मोबदल्यात राजेंद्र चव्हाण यांना दोन रुपये मिळालेत. विशेष म्हणजे या 2 रुपयासाठी संबंधित व्यापाऱ्याने चक्क धनादेश दिला.

आणि त्याहून मजेशीर गोष्ट म्हणजे हा धनादेश पंधरा दिवसानंतर वटवला जाईल अशी तारीख त्यावर नोंदवली. ही गोष्ट सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल झाली. नंतर सोशल मीडियामधलं प्रकरण माध्यमांमध्ये देखील गाजलं. त्यानंतर याची दखल सोलापूर एपीएमसी कडून घेण्यात आली. सोलापूर एपीएमसीने संबंधित व्यापाऱ्याचा परवाना 15 दिवसासाठी निलंबित केला. अशातच आता शासनाकडून देखील प्रकरणाची दखल घेण्यात आली असून संबंधित ट्रेडर्स चा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. सूर्या ट्रेडर्स या सोलापूर एपीएमसी मधील ट्रेडर्स चा परवाना रद्द झाला आहे.

काल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहा पाण्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली आणि या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री महोदय यांनी या संदर्भात माहिती दिली. फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, सोलापूर जिल्ह्यातील राजेंद्र चव्हाण यांनी 512 किलो कांदा विक्री केला मात्र त्यांना दोन रुपये मिळाले.

कारण की संबंधित व्यापाऱ्याकडून वाहतुकीचा खर्च देखील शेतकऱ्याकडून वसूल करण्यात आला होता. मात्र 2014 मधील एका शासन निर्णयाच्या माध्यमातून कमी प्रतीच्या शेतमालासाठी वाहतुकीचा खर्च वजा करता येत नाही. या परिस्थितीत 2014 च्या शासन निर्णयाचा संबंधित ट्रेडर्सकडून उल्लंघन करण्यात आलं असल्याने त्यांचा परवाना रद्द झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिली आहे.