Soybean Price : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘त्या’ एका कारणामुळे सोयाबीन दरात येणार तेजी, काय म्हणताय तज्ञ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Price Hike : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता आगामी काही दिवसात सोयाबीन दरात वाढ होणार असल्याची तज्ञांकडून माहिती देण्यात आली आहे. वास्तविक सोयाबीनचे दर हे सोया तेल आणि सोयापेंड या दोन सोयाबीनच्या बायप्रॉडक्टस वर अवलंबून असतात.

विशेषता सोया पेंडच्या दराचा सोयाबीनच्या दरावर परिणाम हा होत असतो. दरम्यान आता सोयापेंडच्या बाबतीत एक मोठी माहिती हाती आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे आपल्या देशात सोयापेंडला जेवढी मागणी आहे त्यापेक्षा कित्येक तरी अधिक पटीने त्याची निर्मिती होते. अशा परिस्थितीत सोयापेंड निर्यात आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात केली जात असते.

जर निर्यात चांगली झाली तर सोयापेंड दरात वाढ होते आणि याचा परिणाम सोयाबीन दरावर होतो. दरम्यान यंदा सोयापेंड निर्यात वाढणार असल्याचा दावा आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन दरातही तेजी येईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. निश्चितच त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सोयाबीनची या हंगामात 80 लाख टन एवढी निर्मिती होणार आहे.

यापैकी जवळपास 70 लाख टन एवढा पेंडचा म्हणजे ढेपचा वापर देशातच होईल. याचा वापर हा प्रामुख्याने पशुखाद्य इंडस्ट्री मध्ये केला जातो. विशेषता पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये याची मागणी कायम असते. दरम्यान दहा लाख टन सोयाबीन देशात वापराविना पडून राहील अशा परिस्थितीत या सोयाबीन साठी निर्यात आवश्यक राहणार आहे.

तसेच जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्यावर्षीचा काही सोयापेंडचं साठा देखील शिल्लक आहे. यामुळे याची निर्यात झाली तर सोयाबीनच्या दराला आधार मिळण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोया पेंड भारतातुनचं फक्त निर्यात होते असं नाही मग आपल्याच देशाची निर्यात का वाढेल.

तर या ठिकाणी आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अर्जेंटिना जे की प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र आहे त्या ठिकाणी भीषण दुष्काळाची परिस्थिती असून सोयाबीन उत्पादन घटणार आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर मागणी आणि पुरवठा कुठे ना कुठे विस्कळीत होईल. म्हणून याचा इनडायरेक्ट फायदा भारतीय सोयाबीन आणि सोयापेंडला होणार आहे. म्हणजेच सोया पेंड निर्यातीसाठी पूरक परिस्थिती आहे.

गेल्या वर्षी जवळपास साडेसहा लाख टन सोया पेंड निर्यात झाली होती. यंदा मात्र हा आकडा 15 लाख ते वीस लाख टन दरम्यान स्थिरावणार आहे. अर्थातच निर्यात दुपटीने वाढेल. परिणामी दरात तेजी येईल. दरम्यान ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत चार लाख टन पेंडची निर्यात झाली आहे. विशेष म्हणजे अजून अडीच लाख टन निर्यातीचे करार झाले आहेत. या परिस्थितीचा सोयाबीन दराला फायदा होणार आहे.

भविष्यात साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर सोयाबीनला मिळू शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात सोयाबीन विकू नये अस आवाहन जाणकार लोकांनी केल आहे.