कर्मचाऱ्यांनो, खबरदार ! आंदोलन केल तर थेट होणार ‘ही’ कठोर कारवाई; कोणी दिला इशारा?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्यात सध्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन पें आंदोलन सुरु आहे. आपल्या प्रलंबित मागण्या शासनाने मान्य कराव्यात यामुळे कर्मचाऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी देखील आत्मक्लेष आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सेवाशक्ती संघर्ष समितीने आत्मक्लेष आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर समितीने 22 फेब्रुवारी रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र पाठवले होते. या पत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व एसटी कर्मचारी आत्मक्लेष आंदोलन करणार आहेत.

राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या 16 मागण्या मान्य केल्या आहेत.मात्र त्यांची पूर्तता केली जात नाहीये. यामुळे या मागण्यांचीं लवकरात लवकर पूर्तता व्हावी अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी असून याचसाठी आत्मक्लेष आंदोलन कर्मचाऱ्यांच्या वतीने छेडल जाणार आहे.

आत्मक्लेश आंदोलनाचे स्वरूप कसं राहणार

22 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री महोदय यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे आत्मक्लेष आंदोलनदरम्यान राज्यातील एसटी कर्मचारी अन्न, पाणी न घेता कामावर हजर राहणार आहेत. अंगात त्राण येईपर्यंत काम करत राहायचं. असं या आंदोलनाचे स्वरूप आहे. निश्चितच यामुळे शारीरिक हानी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतुकीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. अपघात देखील होऊ शकतो. परिणामी महामंडळाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.

आंदोलनात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महामंडळाकडून यासंबंधी परिपत्रक निर्गमित करण्यात आल आहे. राज्यातील सर्व विभागांना हे परिपत्रक पाठवण्यात आल आहे. निश्चितच महामंडळाने घेतलेली ही कठोर भूमिका आणि एसटी कर्मचाऱ्यांचे अनोख आंदोलन यामुळे वाद पेटण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे.

काय म्हणताय कर्मचारी 

दरम्यान सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आत्मक्लेष आंदोलनामुळे प्रवाशांना कुठलीच इजा होणार नाही त्रास होणार नाही हानी होणार नाही याची काळजी कर्मचाऱ्यांच्या वतीने घेतली जाणार आहे. यासाठी सोमवारी राज्यातील सर्व आगारांकडून संबंधित तहसीलदारांना निवेदने दिली जाणार असल्याची माहिती देखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

एकंदरीत एसटी ही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत तर एसटी महामंडळ हे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं तर कठोर भूमिका घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे महामंडळ आणि महामंडळ कर्मचाऱ्यांचा हा वाद शिगेला पोहोचणार असल्याचे चित्र आहे. आता एसटी कर्मचारी खरंच हे आंदोलन करतात का आणि आंदोलन झाल्यानंतर एसटी महामंडळाकडून खरंच शिस्तभंगाची कार्यवाही या एसटी कर्मचाऱ्यांवर होते का हाच मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.