शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शासनाला अल्टीमेटम ! जर मान्य केलेल्या मागण्यावर ‘या’ तारखेपर्यंत निर्णय झाला नाही तर पुन्हा सुरु होणार कामबंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्यातील अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाला या संबंधित कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली होती. काम बंद आंदोलन सुरू झाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभावामुळे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मोठी हेळसांड सहन करावी लागली होती.

यामुळे शासनावर दबाव तयार झाला होता. अशा परिस्थितीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला सुधारित इतिवृत्ति जारी करावे लागले. राज्य सरकारने मंगळवारी रात्री उशिरा हे सुधारित इतिवृत्त जारी केले. तदनंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या काम बंद आंदोलनाला स्थगिती दिली.

राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने आपल्या प्रलंबित मागणीबाबत राज्य शासनाकडून सुधारित इतिवृत जारी झाल्याने हे काम बंद आंदोलन स्थगित केलं असल तरीदेखील मान्य झालेल्या मागणींवर दहा मार्चपर्यंत निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. इतिवृत्तात मान्य करण्यात आलेल्या मागण्या 10 मार्चपर्यंत निकाली काढण्यात आल्या नाही तर 11 मार्चपासून पुन्हा एकदा बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करू असा इशारा समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा देण्यात आला आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे 2 फेब्रुवारीपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी मात्र राज्य शासनाला तब्बल 12 दिवसांचा कालावधी लागला. पण उशिरा का होईना आंदोलनाची दखल शासनाने घेतली आणि 15 फेब्रुवारी रोजी या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चांअंती कर्मचाऱ्यांच्या मुख्य सहा मागण्या होत्या त्यापैकी चार मान्य करण्यात आल्या. यानंतर शासनाकडून ज्या मागण्या मान्य करण्यात आल्यात त्यांचे इतिवृत्त जाहीर करणे अपेक्षित होते.

मात्र, सरकारने जाहीर केलेल्या इतिवृत्तात या चार मागण्यांबाबत सुस्पष्टता नव्हती. यामुळे 20 फेब्रुवारीपासून या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा लढा उभारला. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य करण्याचे इतिवृत्त शासनाकडून प्रकाशित होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा देखील दिला. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू झाले. यानंतर काम बंद आंदोलनाचा प्रभाव म्हणून बारावीच्या परीक्षांवर संकट उभे राहिले. परिणामी शासनाला लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा लागला.

या अनुषंगाने शासनाकडून मंगळवारी रात्री उशिरा सुधारित इतिवृत्ती जाहीर करण्यात आली. यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकूण सहा मागणी पैकी चार मागण्या मान्य करत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र शासनाने 10 मार्चपर्यंत या मान्य केलेल्या मागण्यांवर योग्य तो निर्णय झाला नाही तर 11 मार्चपासून पुन्हा एकदा या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे आता शासनाकडून 10 मार्चपर्यंत या मान्य झालेल्या मागण्यांवर काय निर्णय होतो याकडे निश्चित सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.