Success Story : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले नाव देशपातळीवर झळकवल आहे. विशेषतः सेंद्रिय शेतीमध्ये राज्याने चांगली प्रगती साधली आहे. अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम पाहता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना सुरुवातीला मात्र शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे.
परंतु शेतकरी बांधवांनी या अडचणीवरही आता मात करत सेंद्रिय पद्धतीने वेगवेगळ्या पिकांची यशस्वी लागवड करत लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साखळी आहे. असाच एक प्रयोग ठाणे जिल्ह्यातून समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या प्रकाश कोर व रामनाथ उंबरगोडे त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केले आहे.
विशेष म्हणजे सेंद्रिय शेती सुरू केली मात्र पारंपारिक पीक पद्धतीला बदल देत हळद पिकाची लागवड त्यांनी केली आहे. परिसरात हे पीक नौक असल्याने या प्रयोगाची संपूर्ण परिसरात सध्या चर्चा पाहावयास मिळत आहे. विशेष बाब म्हणजे प्रयोग नवखा असला तरी देखील मिळवलेलं यश पाहता चांगल्या-चांगल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी तोंडात बोट घातली आहेत. शहापूर तालुक्यातील बेडेकोन व टेंभा येथील शेतकरी रामनाथ उंबरगोंडे व प्रकाश कोर यांनी पारंपारिक भात पिकाला पर्याय म्हणून हळदीची शेती सुरू केली आहे.
विशेष म्हणजे यातून त्यांना एकरी सहा ते सात लाखांची कमाई होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शेतकरी रामनाथ उंबरगोडे सांगतात की त्यांनी आपल्या 25 गुंठे शेतात जमिनीत सेंद्रिय पद्धतीने हळदीची लागवड केली. विशेष म्हणजे या 25 गुंठ्यातून त्यांनी दोन ते तीन लाखांची कमाई करण्याची किमया साधली आहे. निश्चितच या प्रयोगशील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.
या ठिकाणी विशेष बाब अशी की या शेतकऱ्यांनी हळदीवर प्रक्रिया करून हळदीची पावडर तयार करत बाजारपेठ गवसली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना हळद पिकातून चांगले उत्पादन मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. निश्चितच शेतकऱ्यांनी आता केवळ पिकवणेच महत्त्वाचे राहणार नाही तर शेतमाल विकण्यासाठी देखील मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.