अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि ऐश्वर्या-अभिषेक मधील वाद, खरंच आहे का काही कनेक्शन?

Ajay Patil
Published:
Superstar Amitabh Bachchan

 

भारतीय सिनेसृष्टीवर गेल्या कित्येक वर्षापासून अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन आणि त्यांच्या अर्धांगिनी जया बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचा तीन जून रोजी 51 वा वाढदिवस साजरा केला. तसे पाहायला गेले तर अमिताभ बच्चन हे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस प्रत्येक वर्षी खूप स्पेशल आणि वेगळ्या पद्धतीने साजरे करतात. यावर्षी मात्र त्यांचा लग्नाचा वाढदिवस  साजरा करताना कुठल्याही प्रकारचे सेलिब्रेशन किंवा प्रत्येक वर्षाला होणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी यावर्षी होताना किंवा करताना दिसून आले नाहीत.नेमके यामागे काय कारण आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

 प्रत्येक वर्षी आणि यावर्षीच्या लग्नाच्या वाढदिवसातील फरक

जर आपण अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशन बघितले तर अमिताभ बच्चन हे कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात व ते त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी स्पेशल अशा पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. यावर्षी अशा पद्धतीने काहीच घडताना दिसून आले नाही.

यावर्षी अमिताभ बच्चन यांनी लग्नाच्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारची पोस्ट शेअर केली नाही. दुसरे म्हणजे प्रत्येक वर्षाला ते लग्नाचा वाढदिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशी घरी पार्टी आयोजित करतात. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी कुठल्याही प्रकारची पार्टी त्यांनी घरी आयोजित केलेली नाही.

परंतु सिनेसृष्टीतील इतर कलाकारांनी शतकातील या अभिनेत्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे अभिताभ व जया बच्चन यांचे सुपुत्र अभिनेते अभिषेक बच्चन हे प्रत्येक वर्षी अमिताभ व जया बच्चन यांच्या लग्नाच्या वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात व शुभेच्छा देतात.

परंतु यावर्षी त्याने कुठल्याही प्रकारची पोस्ट शेअर केली नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे अनेक प्रकारचे चर्चांना तोंड फुटल्याचे आपल्याला दिसून येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन यांच्या सून ऐश्वर्या राय यादेखील अमिताभ आणि जया बच्चन यांच्या वाढदिवसाला पोस्ट शेअर करून शुभेच्छा देत असतात.

परंतु यावर्षी ऐश्वर्या रायने देखील कुठल्याही पद्धतीची पोस्ट याविषयी शेअर केलीली नाही. विशेष म्हणजे ऐश्वर्या तिच्या सोशल मीडियावर अभिषेक बच्चन ला सोडून बच्चन कुटुंबापैकी इतर कोणाला फॉलो करत नाही.

 खरच सुरू आहे का बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्यामध्ये वाद?

सध्या ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबापैकी कोणाचेच फोटो सध्या शेअर करताना दिसत नाही. यामागे ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबांमध्ये वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. खासकरून हा वाद जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात सुरू असल्याची देखील सांगितले जात आहे.

आपण मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा ऐकल्या असतील. या सगळ्या परिस्थितीत मात्र बच्चन कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही.

एवढेच नाहीतर मागे अशी एक चर्चा होती की ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चन यांचे घर देखील सोडले आहे. त्यामुळे या सगळ्या वाढदिवसाच्या निमित्ताने बदललेली परिस्थिती आणि इतर गोष्टी पाहून खरंच बच्चन कुटुंबामध्ये वाद सुरू आहे का? हा प्रश्न अमिताभ बच्चन व अख्ख्या बच्चन कुटुंबांच्या चाहत्या कडून उपस्थित केला जात आहे.