Tourist Place: महाराष्ट्रातील ‘हा’ तालुका आहे धबधब्यांचे माहेरघर, पावसाळ्यात घ्या आनंद

Ajay Patil
Published:
patan

हाराष्ट्रमध्ये अनेक पिकनिक स्पॉट असून महाराष्ट्राला लाभलेली अद्भुत अशी निसर्ग संपदा महाराष्ट्राचे वैभव आहे. हिवाळ्यामध्ये दाट धूक्याची चादर पांघरलेले डोंगररांगा तर पावसाळ्यामध्ये अवखळपणे वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे, सगळीकडे हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा पाहून मन मोहित होते. महाराष्ट्रातील अनेक तालुके निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असून त्या ठिकाणी असलेल्या डोंगररांगा, धरणे तसेच मोठमोठे धबधबे पाहण्याची क्रेझ वेगळीच असते.

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राला तुलनेने निसर्गाने खूप दिले आहे. याच अनुषंगाने आपण राज्यातील पाटण या तालुक्याचा विचार केला तर  या तालुक्याला निसर्गाची अद्भुत अशी देणगी लाभलेली आहे. या लेखामध्ये आपण पाटण तालुक्यात असलेले निसर्गसौंदर्य आणि पर्यटन स्थळे इत्यादींची माहिती घेणार आहोत.

 पाटण तालुक्याला म्हणतात धबधब्यांचे माहेरघर

राज्यातील पाटण तालुका हा निसर्ग समृद्ध तालुका असून या तालुक्याला धबधब्यांचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक स्थळांमुळे पर्यटना देखील चांगले दिवस येतात. या ठिकाणी पडणारा दमदार पाऊस तसेच कोयना धरण आणि फेसाळत वाहणारे धबधबे  मनाला आकर्षित करतात. त्यामुळे हजारोंच्या संख्येने पर्यटक या परिसराला भेट देतात.

 पाटण तालुक्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे

पाटण तालुक्यामध्ये ओझर्डे, सडा वाघापूरचा रिव्हर्स वॉटर फॉल अर्थात उलटा धबधबा, बोपोली, कोंडावळे, घाटमाथा तसेच शिरळ, माढवराई, कामरगाव  आणि हूंबरळी आणि महत्वाचे म्हणजे कोयना आणि मोरणा तसेच तारळे या ठिकाणाचे आकर्षक असे डोळ्यांचे पारणे फेडतील असे धबधबे सध्या ओसंडून  वाहत आहेत. या ठिकाणी कोयना धरणाचा जलाशय असो किंवा काठी आयलँड या ठिकाणच्या पवनचक्क्या इत्यादींचा प्रदेश आता हिरवागार झालेला आहे.

तसेच कोयनानगर या ठिकाणाचे नेहरू उद्यानातील सौंदर्य हे पर्यटकांना आकर्षित करते. तसेच पाटण तालुक्यात असलेले मोरणा गुहेगर, तारळी इत्यादी अनेक छोट्या मोठ्या धरणाचा परिसर देखील सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहेत. एवढेच नाही तर या ठिकाणी नटलेले स्थानिक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना अभयारण्य व पश्चिम घाट प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन इत्यादी मधील जंगलाचा परिसर देखील सध्या हिरवाईने नटला असून सौंदर्यामध्ये भर पडत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी परराज्यातील पर्यटक देखील मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

 खाण्याच्या राहण्याच्या देखील आहेत उत्तम सुविधा

या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याच्या आणि खाण्याच्या देखील सुविधा उभारण्यात आलेला आहेत. या ठिकाणी असलेले रिसॉर्ट, हॉटेलचा अगदी छोट्या-मोठ्या चहाच्या वडापाव च्या गाड्या, पावसाचा आनंद घेत गरमागरम भजी खाण्यासाठी असलेल्या भजीच्या टपऱ्या या ठिकाणी उपलब्ध आहेत.

त्यामुळे या ठिकाणच्या लोकांना रोजगार तर उपलब्ध झाला आहेच परंतु व्यवसायांना देखील चांगले दिवस आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच तुमचा कुठे फिरायला जायचा प्लान असेल तर या पावसाळ्यात पाटण तालुका हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe