ये हुई ना बात…! ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची आवश्यकताचं नाही ; आता गाईच्या शेणापासून चालणार ट्रॅक्टर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor Can Run Cow Dung : अलीकडे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठा वाढला आहे. खरं पाहता पिकाच्या पेरणीपूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत आता यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. यामध्ये सर्वाधिक उपयोग हा ट्रॅक्टरचा होतो. वेगवेगळी यंत्रे वापरून ट्रॅक्टरच्या साह्याने अलीकडे शेतीची कामे केली जात आहे.

निश्चितच ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे केली जात असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे, शिवाय वेळेवर कामे होत असल्याने उत्पादनात वाढ होत आहे. विशेष म्हणजे मजूर टंचाईवर मात करण्यास यामुळे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. निश्चितच ट्रॅक्टर बिना आता भारतात शेती करणं हे अशक्य बनलं आहे. अगदी अत्यल्पभूधारक शेतकरी ते सधन शेतकरी सर्वांना ट्रॅक्टरची गरज भासत आहे.

अत्यल्प भूधारक शेतकरी बांधव भाडेतत्त्वावर ट्रॅक्टरचा वापर करत आहेत तर सधन शेतकऱ्यांकडे स्वतःचे ट्रॅक्टर आहे. मात्र दिवसेंदिवस इंधनाचे दर आकाशाला गवसणी घालत असल्याने याचा यांत्रिकीकरणावर मोठा विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. डिझेलचे दर पाहता आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामे करणे शेतकऱ्यांना महागात पडू लागले आहे.

मात्र आता यावर उपाय म्हणून एका ब्रिटिश कंपनीने चक्क गाईच्या शेणावर चालणारे ट्रॅक्टर तयार करण्याची किमया साधली आहे. निश्चितचं हे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र एका ब्रिटिश कंपनीने गायीच्या शेणावर चालणारा ट्रॅक्टर तयार करून दाखवला आहे. ब्रिटिशची बेनामनेन या कंपनीने हा असा युनिक ट्रॅक्टर तयार केला आहे. त्यामुळे सध्या या कंपनीची सर्वत्र चर्चा आहे. हा ट्रॅक्टर खरं पाहता गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या मिथेन वायूपासून चालणारा राहणार आहे.

या कंपनीने तयार केलेलं हे गायीच्या शेणावर चालणार म्हणजे मिथेन वायूवर चालणार ट्रॅक्टर २७० हॉर्स पॉवरच असून डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर प्रमाणेच ऊर्जा जनरेट करण्यास सक्षम असून काम देखील डिझेलचेलित ट्रॅक्टर प्रमाणेच करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे डिझेल मधून मोठ्या प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होते.

मात्र या कंपनीने तयार केलेल्या मिथेन वायूच्या साह्याने चालणारे हे ट्रॅक्टर कार्बनचे उत्सर्जन करणार नसणार आहे त्यामुळे पर्यावरणासाठीही हे ट्रॅक्टर फायदेशीर ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे डिझेलचलित ट्रॅक्टरच्या तुलनेत या ट्रॅक्टरसाठी कमी खर्च करावा लागणार आहे.

साहजिकच शेतकऱ्यांसाठी हे ट्रॅक्टर अधिक फायदेशीर राहणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ही कंपनी एका दशकाहून अधिक काळ बायोमिथेन उत्पादनावर संशोधन करत आहे. दरम्यान हे बायोमिथेन तयार करण्यालाठी कंपनीने १०० गायी असलेल्या गोठ्यामध्ये बायोमिथेन उत्पादनासाठी युनिट तयार केलयं.

यामध्ये सदर कंपनीकडून गायीच्या गोमूत्र आणि शेणापासून बायोमेथेन तयार केलं जात आहे. हे बायोमिथेन द्रवरूप असते  जे की १६० अंश तापमानावर क्रायोजेनिक टाक्यांमध्ये ठेवले जाते. आणि ही द्रवरूप मिथेनने भरलेली टाकी ट्रॅक्टरवर फिट केली जाते. अशा पद्धतीने या डिझेल विरहित ट्रॅक्टरला मिथेन वायूच्या साह्याने रन केले जाते.

एका मीडिया रिपोर्ट नुसार, या द्रवरूप मिथेनवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या एक वर्ष चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमध्ये हा ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टर प्रमाणेच चालण्यास सक्षम असल्याचे आढळून आले आहे शिवाय प्रदूषणावर आळा घालण्यासं ट्रॅक्टर मदत करणार असल्याचे या टेस्टिंग मध्ये आढळले आहे.