सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात ‘हे’ 2 दिवस गारपीट अन वादळी पाऊस पडणार, IMD चा ईशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : रविवारी आणि काल सोमवारी राज्यातील काही भागात हलक्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. मराठवाड्यातील लातूर शहरात तसेच जिल्ह्यातील काही भागात, मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यात, पंढरपूर मध्ये पावसाची हजेरी लागली असून हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान तज्ञांकडून नमूद केले जात आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेला चाहूल लागली आहे ती मान्सून आगमनाची. एकीकडे राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे तर काही भागात उष्णतेची लाट आली आहे.

दरम्यान 24 आणि 25 मे रोजी अर्थातच उद्या आणि परवा राज्यातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच वादळी पाऊस देखील राज्यात पाहायला मिळणार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 24 आणि 25 मे रोजी राज्याच्या विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता कायम राहणार आहे. साहजिकच यामुळे तेथील शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

कुठवर आला मान्सून

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार 19 मे 2023 रोजी मान्सूनचे अंदमान मध्ये आगमन झाले होते. तो बंगालच्या उपसागरात अंदमानच्या इंदिरा पॉईंट म्हणजेच नानकोवरी बेटापर्यंत पोहोचला होता. आता गेल्या तीन दिवसांपासून मात्र मानसून तिथेच मुक्कामी आहे. काल सोमवार पर्यंत मान्सूनच्या प्रवासात प्रगती झालेली नाही.

21 मे पर्यंत मान्सून पोर्ट ब्लेअर मध्ये दाखल होत असतो मात्र आता 23 मे उजाडली आहे पण पोर्ट ब्लेअर पासून मान्सून 415 किलोमीटर अंतरावर आहे. वास्तविक हवामान विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की मान्सून जरी अंदमानमध्ये लवकर पोहोचत असला तरी देखील त्याला केरळ येण्यासाठी होणार आहे तसेच महाराष्ट्रात दाखल होण्यास देखील उशीर होण्याचा अंदाज आहे.